शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

बिबट्याच्या पिल्लाला वन विभागाची उब

By admin | Updated: May 19, 2016 00:17 IST

दापोली तालुका : ताटातूट झालेल्या लेकरासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न

शिवाजी गोरे--दापोली --जंगलात बिबट्याची मादी व पिल्लाची ताटातूट होऊन पोरके झालेल्या त्या पिल्लासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. आई व लेकराची भेट घडून येईपर्यंत बिथरलेल्या दहा दिवसांच्या त्या पिल्लाला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक मायेची ऊब देत आहेत. दापोली तालुक्यातील एका जंगलात बिबट्याचे दहा दिवसांचे पिल्लू वन विभागाला आढळून आले. त्या पिल्लाला वन विभगााने ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार केले व दूध दिले. त्या पिल्लाला योग्य वेळी दूध मिळाले नसते तर भूकबळीचा शिकार होऊन ते दगावण्याची शक्यता अधिक होती. परंतु वन विभागाने त्याची खबरदारी घेऊन त्याला दूध पाजून पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याच्यावर उपचार करवून घेतले. त्यामुळे त्याची प्रकृती चांगली आहे.ते ज्या ठिकाणी सापडले होते, त्या ठिकाणी मंगळवारी रात्रभर पाळत ठेवण्यात आली होती. कॅमेरे लावून ठेवण्यात आले. परंतु ती त्या पिल्लाकडे फिरकलीच नाही. त्यामुळे त्या पिल्लाने अख्खी रात्र ओरडून काढली. आजूबाजूच्या परिसरात जवळच कुठेतरी ती असण्याची शक्यता असल्याने ज्या जंगलात ते पिल्लू आढळून आले. त्या ठिकाणी पिल्लू ठेवून पाळत ठेवण्यात येत आहे. बिबट्याची मादी पिल्लू दुसरीकडे नेताने मनुष्याचा वावर वाढल्याने किंवा त्या ठिकाणी असुरक्षित वाटल्याने पुन्हा त्या ठिकाणी आली नसावी. दोन दिवस माय लेकराची भेट न झाल्याने वनविभागाची चिंता अधिक वाढली आहे. जंगलतोडी, वणव्यामुळेसुध्दा कदाचित पिल्लू स्थलांतरीत करताना एखादं पिल्लू विसरलं जाण्याची शक्यता आहे. जंगलतोडीमुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने बिबटे मानवी वस्तीकडे येणे असुरक्षित वाटू लागताच पिल्लू टाकून निघून जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. राज्यात भूकबळी, शिकारींचे प्रमाण वाढल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. या पिल्लाला जीवदान देण्यासाठी दापोलीचे वनपाल मारुती जांभळे, वनरक्षक अमित निमकर, भीमराव चौगले, अनिल साळवी, सचिन आंबेडे, वनकर्मचारी सहकार्य करीत आहेत. दापोलीत आढळलेल्या त्या पिल्लाची योग्य काळजी घेण्यात येत असून, दोन दिवसांत मादी न आल्यास त्याला प्राणी संग्रहालयाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. - सुरेश वरक, वन परिक्षेत्र अधिकारी, दापोली