शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दिवाळीपूर्वी पूर्तता व्हावी, अन्यथा..; संघटनेने दिला इशारा

By मेहरून नाकाडे | Updated: October 18, 2023 14:37 IST

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची मागणी

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ दराच्या थकबाकीबाबत शासनाने दिवाळीपूर्वी निर्णय घेण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.महाराष्ट्र एस.टी कामगार संघटनेच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या संघटनेच्या बेमुदत उपोषण नोटीस अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शासन पातळीवर एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २४ टक्क़्यावरून ४२ टक्के महागाई भत्ता सप्टेंबरच्या देय आॅक्टोबरच्या वेतनापासून लागू करण्यात आला आहे.महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी देण्याबाबत १५ दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त संघटनेसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केले होते. परंतु अद्याप बैठक झालेली नाही. दिवाळीसारखा महत्वाचा सण दि. १० आॅक्टोबर पासून सुरू होत आहे. त्यामुळे वरील सर्व थकबाकीबाबत निर्णय होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना थकबाकी मिळणे आवश्यक आहे. तसेच संघटनेने मागणी केल्यानुसार सर्वच कामगारांना दिवाळी भेट देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.यावेळी केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप साटम, कार्याध्यक्ष शेखर सावंत, विभागिय संघटनेचे अध्यक्ष राजेश मयेकर, सचिव रवि लवेकर, कार्याध्यक्ष शेखर सावंत, विभागिय अध्यक्ष अमित लांजेकर उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीST Strikeएसटी संप