शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे मार्गावर ९७४ कर्मचाऱ्यांची गस्त, १० जूनपासून पावसाळी वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 15:37 IST

कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी हे वेळापत्रक कार्यान्वित राहील. पावसाळयातील प्रवाशांंच्या सुरक्षितेसाठी कोकण रेल्वे सर्व त्या सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे. या कालावधीत ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मार्गावर २४ तास गस्त राहणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे

ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावर ९७४ कर्मचाऱ्यांची २४ तास गस्त, १० जूनपासून पावसाळी वेळापत्रकप्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वे सज्ज

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी हे वेळापत्रक कार्यान्वित राहील. पावसाळयातील प्रवाशांंच्या सुरक्षितेसाठी कोकण रेल्वे सर्व त्या सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे. या कालावधीत ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मार्गावर २४ तास गस्त राहणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहेलॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि श्रमिकांच्या घरवापसीसाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या कोकण रेल्वेने याच कालावधीत आपली मान्सूनपूर्व सुरक्षा उपाययोजनांची कामेही पूर्ण केली आहेत. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या आपल्या ७४० किलोमीटरच्या पट्ट्यात मान्सून पूर्व कामांना काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती.

पावसात कोकण रेल्वे मार्गावर पाणी येऊ नये, यासाठी पाण्याचे मार्ग मोकळे करणे आणि मार्गानजीकच्या कटिंगची पाहणी करून धोकादायक वाटणारी कटिंग काढून टाकणे, याला प्राधान्य देण्यात आले. गेल्या काही वर्षात पावसाळापूर्व उपाययोजनांमुळे गेल्या सात वर्षात मार्गावर दरड व माती येण्याचे प्रकार खूप कमी झाले आहेत.धोकादायक कटिंग आहेत, अशा ठिकाणी विशेष उपाययोजना केल्या असून या ठिकाणी २४ तास कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. अशा ठिकाणांवर रेल्वेचा वेगही नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदत मिळावी यासाठी ठराविक अंतरांवर पोकलेन मशिन्स सारखी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.मुसळधार पावसाच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याची खबर देणारी यंत्रणा मार्गावर तीन पुलांवर ठिकाणी सुसज्ज आहे. पुराचे पाणी धोकादायक पातळीच्या वर आल्यास ही यंत्रणा सतर्क करते. माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडपी येथे पर्जन्यमापक यंत्रणा मार्गावरील ९ स्थानकांमध्ये सुसज्ज असून, अतिवृष्टी काळात ही यंत्रणा सूचना करेल.

मान्सूनच्या काळात बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव या तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष २४ तास रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत राहणार आहे. पावसाळयातील सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वे सर्व सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी