राजापूर : प्रवासी वाहतुकीचा कोणताही ई-पास नसताना, प्रवाशांची कोरोना चाचणी न करता, प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी आराम बस मालक, चालक व क्लीनर यांच्या विरोधात नाटे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २९ मे रोजी करण्यात आली़
या प्रकरणी पोलीस काॅन्स्टेबल संभाजी विलास कदम यांनी तक्रार दाखल केली आहे. विना ई-पास व प्रवाशांची कोरोना चाचणी न करता, खासगी आराम बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत हाेते. त्यांनी नियमांचा भंग केला, म्हणून किशोर ब्रह्माजी मुद्रस (५२, रा.चेंबूर), प्रशांत रमेश पडवळ (४०, रा.लांजा बौद्धवाडी), अक्षय सदानंद नावळे (२७, रा.वारगाव धुमकवाडी सिंधुदुर्ग) या तिघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास नाटे पाेलीस करत आहेत.