शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी रद्द करण्यास भाग पाडू, मुंबईतील बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 17:08 IST

कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेतर्फे मुंबईतील शिरोडकर हायस्कूल, परळ येथे नाणार रिफायनरी प्रकल्पग्रस्त १७ गावच्या कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूर येथील लाक्षणिक उपोषणात ग्रामस्थांनी सहभागी होऊन सरकारला रिफायनरी रद्द करण्यास भाग पाडण्याचा निर्धार करण्यात आला.

ठळक मुद्देरिफायनरी रद्द करण्यास भाग पाडू, मुंबईतील बैठकीत निर्धार- नागपूर येथील उपोषण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा

राजापूर : कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेतर्फे मुंबईतील शिरोडकर हायस्कूल, परळ येथे नाणार रिफायनरी प्रकल्पग्रस्त १७ गावच्या कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूर येथील लाक्षणिक उपोषणात ग्रामस्थांनी सहभागी होऊन सरकारला रिफायनरी रद्द करण्यास भाग पाडण्याचा निर्धार करण्यात आला.राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरीविरोधात दिनांक ११ जुलै रोजी नागपूर येथे विधिमंडळाबाहेर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्त गावातून ५०० महिला-पुरुष नागपुरात पोहोचणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबईत संबंधित गावांच्या कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्यासह रामचंद्र भडेकर, नितीन जठार, गिरीश मोंडे, सत्यजीत चव्हाण, योगेश नाटेकर, राजेंद्र फातारपेकर, संजय देसाई व १७ गावचे कमिटी सभासद उपस्थित होते.यावेळी अशोक वालम यांनी सांगितले की, गेले एक वर्ष येथील ग्रामस्थ प्रस्तावित रिफायनरीविरोधात संघर्ष करीत आहेत. डिसेंबर २०१७चे नागपूर हिवाळी अधिवेशन, मुंबईतील २०१८चे बजेट अधिवेशनकाळात धरणे-उपोषण आंदोलन करण्यात आले.

अनेक मोर्चे, सभा, बंद, असहमती पत्र, संयुक्त मोजणी होऊ न देणे आदी कृतींद्वारे स्थानिक ग्रामस्थांचा विरोध किती तीव्र आहे, हे दिसून आले आहे. १४ मार्च रोजीच्या धरणे आंदोलनात मुंख्यमंत्र्यांनी भेटीदरम्यान ग्रामस्थांचा विरोध असल्यास जबरदस्तीने प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासनही दिले होते. मात्र, कोकणी जनतेच्या संघर्षाकडे मुख्यमंत्री व केंद्र सरकार लक्ष देत नाहीत. शिवसेना सत्तेत असूनही अध्यादेश रद्द करण्यात असमर्थ ठरल्याचे वालम म्हणाले.सर्वपक्षीय आमदारांना पत्रपावसाळी नागपूर अधिवेशनादरम्यान एक दिवसाचे लाक्षणिक धरणे उपोषण आंदोलन नागपूर विधिमंडळाबाहेर केले जाणार आहे. सर्वपक्षीय आमदारांना संघटनेतर्फे ११ जुलै रोजी आंदोलनाच्या दिवशी सभागृहात सरकारला रिफायनरी जबरदस्तीने रेटण्याबाबतचा जाब विचारून प्रसंगी सभागृह बंद पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी