शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट खचतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 16:02 IST

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील जमीनदारांच्या मोबदल्याचा गुंता अजूनही न सुटल्याने चौपदरीकरणाचे रखडलेले आहे. पावसाळ्यात याठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.

संदीप बांद्रेचिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील जमीनदारांच्या मोबदल्याचा गुंता अजूनही न सुटल्याने चौपदरीकरणाचे रखडलेले आहे. पावसाळ्यात याठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यातच आता काही ठिकाणी रस्ता खचू लागल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे़  त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे़  या भागात सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे.मुंबई - गोवामहामार्ग चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. मात्र, मोबदल्यावरून परशुराम देवस्थान, खोत व कुळ यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. या वादामुळे परशुराम घाटातील काम स्थगित ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने सूचना करूनही ठेकेदार कंपनी या भागात स्थानिक वादामुळे काम करण्यास तयार नाही.जमीन मालक, खोत व कुळांनी आपापसात तोडगा काढावा. पावसाळ्यानंतर काम सुरू करू, असे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते. तसेच कूळ ८० टक्के, खोत १० टक्के व देवस्थान १० टक्के अशा पद्धतीने मोबदल्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांच्याकडून कूळ व देवस्थानसाठी ९०- १० चा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, या दोन्ही प्रस्तावांवर अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे पेढे व परशुरामच्या ग्रामस्थांनी पुन्हा चौपदरीकरणास तीव्र विरोध केला. त्यानंतर आजतागायत परशुराम घाटातील कामाला सुरुवात झालेली नाही. या मार्गावरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे या भागाकडे वेळीच लक्ष न दिल्यास हा भाग काेसळून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त हाेत आहे. सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून, पावसामुळे हा भाग आणखीन ठिसूळ हाेऊन ढासळण्याचा धाेका वाढला आहे.घाटात नेहमी दरड कोसळणाऱ्या ठिकाणापासून पुढे ४०० मीटरपर्यंत कल्याण टोलवेजकडे तर त्या पूर्वीचा भाग  चेतक इन्फ्राकडे आहे. परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यापासून चौपदरीकरणाचे आले आहे. त्यापुढील काम रखडले असून, तेच अधिक धोकादायक बनले आहे. गत वर्षी परशुराम घाटात ५ ते ६ वेळा दरड कोसळली होती. मात्र, आता मोठ्या वळणावर रस्ता खचला आहे़  त्यामुळे या भागातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे.केवळ ५ मिनिटात स्थगितीविशेष म्हणजे प्रामुख्याने हा भाग चिपळूण विभागाकडे न येता तो महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येतो. कल्याण टोलवेज कंपनीमार्फत हे काम केले जात आहे. गेल्या तीन वर्षापासून मोबदल्याच्या वादावरून चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी एकदा पोलीस फौजफाट्यात काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्याने कामास ५ मिनिटांत स्थगिती मिळाली.घरांना धोकापावसाळ्यात परशुराम घाटातील दरड कोसळून पायथ्यालगतच्या पेढे गावातील तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच तेथील सहा घरांना फटका बसला. मात्र, अजूनही हा धोका कायम आहे. या घाटाच्या खालील बाजूला मोठी वस्ती आहे़ या घरांसाठी दिवसेंदिवस धोका वाढत चालला आहे. त्यामुळे या प्रश्नी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून ठोस निर्णय देण्याची मागणी केली जात आहे.

आतापर्यंत परशुराम घाटासंदर्भात अनेक आश्वासने दिली गेली. जिल्हाधिकाऱ्यांनी कूळ व देवस्थानसाठी दिलेल्या ९०-१० च्या प्रस्तावावरही मंत्रालयात चर्चा झाली. परंतु त्यावर अंतिम निर्णय दिला गेला नाही. त्यातच कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्याने या विषयाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता शेतकरी न्यायालयात दाद मागण्याच्या मानसिकतेत आहेत. - प्रवीण पाकळे, अध्यक्ष, संघर्ष समिती, पेढे-परशुराम.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग