शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

हर्णै येथे आढळलेल्या बोटीच्या मालकाचा लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 17:00 IST

Harnai port Dapoli ratnagiri- दापोली तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी संशयास्पद आढळलेल्या त्या बोटीच्या मालकाचा शोध लागला असून, ती बोट मुरुड येथील मासूम एनरकर यांच्या मालकीची असल्याचे हर्णै पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या बोटीबाबत करण्यात आलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

ठळक मुद्देहर्णै येथे आढळलेल्या बोटीच्या मालकाचा लागला शोध मच्छिमारांमध्ये होते भीतीचे वातावरण

दापोली : तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी संशयास्पद आढळलेल्या त्या बोटीच्या मालकाचा शोध लागला असून, ती बोट मुरुड येथील मासूम एनरकर यांच्या मालकीची असल्याचे हर्णै पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या बोटीबाबत करण्यात आलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.मुरूड येथील मासूम एनरकर यांनी ही फायबर बोट पाच वर्षांपूर्वी समुद्र सफरसाठी आणली होती. दोन वर्षांपूर्वी श्रीवर्धन येथील सिद्धिकी शिरगावकर यांना दिली होती. त्यांनी दुरुस्तीसाठी आंजर्ले खाडीत ही बोट उभी करून ठेवली होती. या बोटीचा दोर तुटल्याने ती हर्णै समुद्रात आली होती. बरेच दिवस ही बोट तेथेच राहिल्याने मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.हर्णै दूरक्षेत्राचे प्रमुख मोहन कांबळे यांच्या टीमने संपूर्ण दिवस आंजर्लेखाडी परिसरात गस्त घातली होती. या बोटीच्या मालकाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेच्या आधारे त्या बोटीच्या मालकाचा शोध लावला. हर्णै समुद्रकिनारी आढळलेल्या त्या बोटीच्या प्रकरणावर पोलिसांनी पडदा टाकला असून, बोटीतून कोणीही आले नाही. तसेच ही बोट संशयास्पद नसल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Harnai portहर्णै बंदरDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतRatnagiriरत्नागिरी