हर्णै येथे आढळलेल्या बोटीच्या मालकाचा लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:57 PM2021-03-18T16:57:12+5:302021-03-18T17:00:41+5:30

Harnai port Dapoli ratnagiri- दापोली तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी संशयास्पद आढळलेल्या त्या बोटीच्या मालकाचा शोध लागला असून, ती बोट मुरुड येथील मासूम एनरकर यांच्या मालकीची असल्याचे हर्णै पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या बोटीबाबत करण्यात आलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

The owner of the boat was found at Harnai | हर्णै येथे आढळलेल्या बोटीच्या मालकाचा लागला शोध

हर्णै येथे आढळलेल्या बोटीच्या मालकाचा लागला शोध

Next
ठळक मुद्देहर्णै येथे आढळलेल्या बोटीच्या मालकाचा लागला शोध मच्छिमारांमध्ये होते भीतीचे वातावरण

दापोली : तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी संशयास्पद आढळलेल्या त्या बोटीच्या मालकाचा शोध लागला असून, ती बोट मुरुड येथील मासूम एनरकर यांच्या मालकीची असल्याचे हर्णै पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या बोटीबाबत करण्यात आलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुरूड येथील मासूम एनरकर यांनी ही फायबर बोट पाच वर्षांपूर्वी समुद्र सफरसाठी आणली होती. दोन वर्षांपूर्वी श्रीवर्धन येथील सिद्धिकी शिरगावकर यांना दिली होती. त्यांनी दुरुस्तीसाठी आंजर्ले खाडीत ही बोट उभी करून ठेवली होती. या बोटीचा दोर तुटल्याने ती हर्णै समुद्रात आली होती. बरेच दिवस ही बोट तेथेच राहिल्याने मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हर्णै दूरक्षेत्राचे प्रमुख मोहन कांबळे यांच्या टीमने संपूर्ण दिवस आंजर्लेखाडी परिसरात गस्त घातली होती. या बोटीच्या मालकाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेच्या आधारे त्या बोटीच्या मालकाचा शोध लावला. हर्णै समुद्रकिनारी आढळलेल्या त्या बोटीच्या प्रकरणावर पोलिसांनी पडदा टाकला असून, बोटीतून कोणीही आले नाही. तसेच ही बोट संशयास्पद नसल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: The owner of the boat was found at Harnai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.