लांजा महाविद्यालयात पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:36 AM2021-08-18T04:36:57+5:302021-08-18T04:36:57+5:30

लांजा : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाइन ...

Organizing a letter writing competition at Lanza College | लांजा महाविद्यालयात पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन

लांजा महाविद्यालयात पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन

Next

लांजा : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाइन पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, विषयाचे बंधन नाही. शब्दसंख्या मर्यादा ७०० असून, पत्र मोबाइलवर टाईप करून स्पर्धा संयोजक प्रा. डॉ. महेश बावधनकर यांना ३१ ऑगस्टपर्यंत पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रथम क्रमांकाला रु. १ हजार, द्वितीय क्रमांकाला रु. ७५०, तृतीय क्रमांकाला रु. ५०० तर उत्तेजनार्थ म्हणून दोघांना प्रत्येकी रु. २५० व प्रमाणपत्र अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाइन प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहे. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी डॉ. महेश बावधनकर यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मराठी विभाग प्रमुख डॉ. महेश बावधनकर, प्रा. सचिन गिजबिले, उपप्राचार्य डॉ. के.आर. चव्हाण व प्राचार्य डॉ. अरविंद कुळकर्णी यांनी केले आहे.

Web Title: Organizing a letter writing competition at Lanza College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.