शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी विरोधात विधानभवनासमोर कोकणच्या आमदारांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 17:34 IST

राजापूर तालुक्यातील नाणार - कुंभवडे परिसरातील बाभूळवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी रिफायनरीविरोधात जोरदार घोषणाबाजी करून विधानभवन परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्देरिफायनरीविरोधात शिवसेनेच्या आमदारांची जोरदार घोषणाबाजीकोकणच्या आमदारांनी दणाणून सोडला विधानभवन परिसर

राजापूर : राजापूर तालुक्यातील नाणार - कुंभवडे परिसरातील बाभूळवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी रिफायनरीविरोधात जोरदार घोषणाबाजी करून विधानभवन परिसर दणाणून सोडला.या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असून, स्थानिक आमदार म्हणून आमदार राजन साळवी वेळोवेळी हा प्रकल्प रद्द होण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. रिफायनरी प्रकल्प रद्द करा, रिफायनरी हटवा, कोकण वाचवा अशा घोषणा देत बुधवारी शिवसेनेच्यावतीने नागपूर येथे विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्यात आले. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत ग्रामस्थांच्या पाठीशी राहू, असे आश्वासन देत शिवसेनेच्या आमदारांनी प्रकल्पाविरोधात निदर्शने केली.या आंदोलनात शिवसेना विधानसभेचे गटनेते आमदार सुनील प्रभू, शिवसेनेचे कोकण पक्ष प्रतोद आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण, आमदार भरत गोगावले, आमदार वैभव नाईक, आमदार उदय सामंत, आमदार सुनील शिंंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार तृप्ती सावंत, आमदार मनोहर भोईर, आमदार तुकाराम काटे आदी सहभागी झाले होते.विधानसभेतही चर्चागेले काही दिवस रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेची भूमिका संदिग्ध असल्याचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे शिवसेनेची गोची झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न उचलण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून विधानभवनातही या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Rajan Salviराजन साळवीRatnagiriरत्नागिरी