रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रत्येक महिन्याचा लोकशाही दिन साजरा होतो. सध्या कोरोनाचे संकट असल्याने जुलै महिन्याचा लोकशाही दिन ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रत्येक महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जुलै महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, ५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात न होता झूम या ॲपद्वारे होणार आहे. हा लोकशाही दिन दुपारी १ ते २ यावेळेत होणार असून, त्याकरिता लिंक देण्यात आली आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकारी राजश्री मोरे यांनी कळविले आहे.
लिंक अशी : https://zoom.us/j/96595592123?pwd=akg5RWFmTEs2VXFRTEZCMFLoNVF5QT09
Meeting id: ९६६९५५९२१२३ Passcode : ०५०७