शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याआधी महामार्गाची एक बाजू पूर्ण करणार : मंत्री चव्हाण

By मनोज मुळ्ये | Updated: April 15, 2023 18:32 IST

आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी मंत्री चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कोकण दौऱ्यानंतर कामाला अधिक गती आली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची एक बाजू पूर्ण करण्याचा आणि डिसेंबर २०२३ पर्यंत दुसरी बाजू पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी मंत्री चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पक्षाला बळकटी यावी, बूथ समित्या अधिक सक्षम व्हाव्यात, केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेले निर्णय, वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत जाव्यात, यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये चांगला समन्वय आहे आणि भविष्यात तो अजून चांगला होईल, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्राचे अनेक प्रकल्प मागे पडले होते. राज्य सरकारने त्यासाठी आपला हिस्सा न दिल्यामुळे काही चांगल्या योजना राबवल्या गेल्या नाहीत. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्या योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे, असे ते म्हणाले.

दिवाळीत आनंदाचा शिधा योजनेचा लाभ ९८ टक्के लोकांनी घेतला होता. आता गुढीपाडवा ते आंबेडकर जयंती या काळात ७० ते ७५ टक्के लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि अजूनही त्याचा कालावधी बाकी असल्याने या काळात अधिकाधिक लोक त्याचा लाभ घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बांधकामसह अनेक खात्यांत अनेक पदे रिक्त आहेत. त्यांची दखल घेतली असून, टप्प्याटप्प्याने भरती केली जात असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :highwayमहामार्ग