साखरपा : पावस (ता. रत्नागिरी) येथून मलकापूरला चिरा घेऊन जाणारा ट्रक आंबा घाटातील दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने घडली. या अपघातात सचिन पाटील (३३) याचा जागीच मृत्यू झाला.पावस येथून ट्रक (एमएच ०९, बीसी ७२४१)मधून चिऱ्याची वाहतूक करण्यात येत होती. या ट्रकमध्ये चालक, क्लिनर व हमाल असे प्रवास करीत होते. आंबा घाटातील गायमुखाच्या १ किलोमीटर अलिकडे हा ट्रक आला असता चालकाला अंदाज आला नाही आणि ट्रक दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे सर्व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तसेच देवरूख पोलीस निरीक्षक मारुती जगताप हेही घटास्थळी दाखल झाले होते.रात्रीच्या अंधारात साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे रोहित यादव आणि प्रशांत यादव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार खोल दरीमध्ये उतरून रेस्क्यू ऑपरेशन करून जखमींना वर काढले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी आंबा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 17:41 IST
Accident Ratnagiri : पावस (ता. रत्नागिरी) येथून मलकापूरला चिरा घेऊन जाणारा ट्रक आंबा घाटातील दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने घडली. या अपघातात सचिन पाटील (३३) याचा जागीच मृत्यू झाला.
आंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक ठार
ठळक मुद्देआंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक ठार रेस्क्यू ऑपरेशन करून जखमींना काढले वर