खेड : मुंबई गोवा महामार्गावर मोरवंडे फाट्यानजीक दुचाकी (एमएच ०८ एजे ३४७९) आणि टाटा सुमो (एमएच ०१ बीटी ०८१७) समोरासमोर आपटून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झाला. संभाजी गंगाराम आखाडे (४३, तिसंगी आखाडेवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.दुचाकीस्वाराच्या मागे बसलेला नरेंद्र किशोर शिरकर (रा. कळंबट- सुतारवाडी ता. चिपळूण) हा गंभीर जखमी झाला असून तो बेशुद्धावस्थेत आहे. त्याच्यावर लवेल येथील घरडा हॉस्पिटल येथे उपचार करून चिपळूणला हलवण्यात आले.खेडकडून चिपळूणकडे जाणारे संभाजी आखाडे आपल्या दुचाकीने महामार्गावर ट्रकला ओव्हरटेक करत होते. समोरून चिपळूण ते मुंबईच्या दिशेने येणाऱ्या टाटा सुमो गाडीशी त्यांची समोरासमोर टक्कर झाली. त्यात संभाजी आखाडे जागीच मृत्युमुखी पडले तर नरेंद्र शिरकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
खेडनजीक दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 17:58 IST
Accident Ratnagiri- मुंबई गोवा महामार्गावर मोरवंडे फाट्यानजीक दुचाकी (एमएच ०८ एजे ३४७९) आणि टाटा सुमो (एमएच ०१ बीटी ०८१७) समोरासमोर आपटून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झाला. संभाजी गंगाराम आखाडे (४३, तिसंगी आखाडेवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
खेडनजीक दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
ठळक मुद्देखेडनजीक दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीरटाटा सुमो गाडीशी समोरासमोर टक्कर