शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

दुचाकीवर कंटेनर कोसळून एक ठार

By admin | Updated: July 3, 2014 00:36 IST

एकजण गंभीर जखमी : परशुराम घाटात अपघात

आवाशी/ चिपळूण : चाटवहून खेडमार्गे तुरंबवला जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर कंटेनर कोसळून दुचाकीचालक सुरेश बाबा गोरे (वय ४८, रा. तुरंबव, चिपळूण) ठार झाले, तर त्यांचा मागे बसलेला सहकारी सुरेश ठेंगू गोरे (५३, रा. कोंडमळा नारळीची वाडी, ता. चिपळूण) गंभीर जखमी झाला. मुंबई-गोवा महामार्गावर लोटेनजीक परशुराम घाटात आज, बुधवारी सकाळी हा अपघात झाला. ते काल, मंगळवारी आपल्या मामाकडे चाटव येथे गेले होते. आज सकाळी दुचाकी (एम्एच-०८ एसी ८४३५) वरून ते तुरंबवकडे येण्यासाठी निघाले होते. याच दरम्यान, महामार्गावर न्हावाशेवा येथून एक कंटेनर (एमएच-४६ एफ ३११४) गोव्याकडे जात होता. परशुराम बसस्थानकाअगोदर असलेल्या अवघड वळणावर दुचाकी पुढे होती आणि कंटेनर मागून येत होता. यावेळी कंटेनरची दुचाकीला धडक बसली. त्यामुळे दुचाकी पडली आणि फरफटत गेली. दुचाकी पडल्यामुळे कंटेनरचालकाने ब्रेक लावला; मात्र वळणावर ब्रेक लावल्यामुळे कंटेनर उलटला. तोपर्यंत कंटेनर पुढे आला होता. त्यामुळे उलटलेला कंटेनर दुचाकीवरच कोसळला. उलटलेल्या कंटेनरसोबत दुचाकी जवळजवळ २० फूट लांबपर्यंत घासत गेली. त्यात दुचाकी चालक सुरेश बाबा गोरे जागीच ठार झाले. त्यांचे हातपाय तुटले होते. मागे बसलेल्या सुरेश ठेंगू गोरे यांचा उजवा पाय नळीजवळ तुटला आणि अक्षरश: तुकडा पडला. अपघातामुळे तासभर महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. प्रवासी व पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले; मात्र जखमीचे तुटलेले अवयव पाहून सारेच सुन्न झाले. दोघांनाही तत्काळ डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. जखमी सुरेशवर सायंकाळी शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. आर. चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत. (प्रतिनिधी)