शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

गव्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी, लांजा तालुक्यातील पहिली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 13:33 IST

गव्याने वृद्धा हल्ला केल्यानंतर माचाळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

लांजा : भातशेतीला बांधणीसाठी लागणारे बंध काढण्यासाठी जंगलात गेलेल्या भिकाजी राघव मांडवकर या ७० वर्षीय वृद्धावर गव्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना लांजा तालुक्यातील माचाळ येथे रविवारी दुपारी २.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान घडली. गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. गव्याने हल्ला केल्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.सध्या भात कापणीची लगबग सुरु आहे. भात बांधणीसाठी लागणारे बंध काढण्यासाठी माचाळ येथील भिकाजी मांडवकर हे वाडीतील सात ते आठजणांसह माचाळ ते प्रभानवल्ली जंगलामध्ये दुपारी गेले हाेते. झाडाचे बंध काढत असतानाच गवा रेड्याने भिकाजी मांडवकर यांच्यावर हल्ला चढवला.त्यांच्या पोटामध्ये गव्याने शिंग खुपसून त्यांना उडवून दिले. या हल्ल्यात मांडवकर हे गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या मांडवकर यांना त्यांच्यासाेबत असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने जंगलाबाहेर आणले. तातडीने १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटाला दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रत्नागिरी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक विक्रम कुंभार, संजय रणधीर यांनी घटनास्थळी भेट दिली. गव्याने वृद्धा हल्ला केल्यानंतर माचाळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी