शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

घरकुल योजनेबाबत अधिकारी धारेवर

By admin | Updated: October 10, 2015 23:38 IST

गुहागर पंचायत समिती सभा : मागासवर्गीयांची फसवणूक झाल्याचा आरोप

गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या मासिक सभेत जिल्हा परिषद अंतर्गत रमाई घरकुल योजनेच्या कामामध्ये हेतूपुर्वक पैसे देत नसल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. ही मागासवर्गीयांची फसवणूक असून, वेळेत पेमेंट न केल्यास अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा उपसभापती सुरेश सावंत यांनी दिला. जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत रमाई घरकुल योजनेची १०४ कामे झाली असताना फक्त २० कामांचेच मुल्यांकन झाले आहे. उर्वरित ८४ कामांचे हेतूपुरस्सर पेमेंट अडवून ठेवल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ गुन्हा दाखल करावा लागेल असा इशारा दिला. सभापती राजेश बेंडल यांनीही ही बाब गंभीर असून, असा हलगर्जीपणा करु नका, असे सांगत दुजोरा दिला. इंदिरा आवास अंतर्गत ६५ पैकी २३ कामे अपूर्ण असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. १३व्या वित्त आयोगांतर्गत महिना अखेरपर्यंत निधी खर्ची टाकण्याची मुदत राहिली असताना १९ लाख रुपये निधी अद्याप खर्ची पडायचा राहिला असल्याचे निदर्शनास आणून दिले. खालचा पाट अंगणवाडी निर्लेखन झाली नसताना ६ आॅक्टोबरला भूमिपूजन कसे झाले? असा प्रश्नही या सभेत करण्यात आला. याविषयी कनिष्ठ अभियंता ढगे व उपअभियंता डी. आर. साळवी यांना धारेवर धरण्यात आले. एस. टी.चे आगार व्यवस्थापक मासिक सभेला एकदाही येणार नसतील तर आमसभेतही प्रवेश देणार नाही, असे सुनावण्यात आले. गणेशोत्सवात २३३ जादा गाड्या सोडण्यात आल्याची माहिती या सभेत देण्यात आली. टेलिफोन अंतर्गत आरे येथील टॉवर बीएसएनएलचा असून, अन्य कंपनीला कसा वापरायला दिला? असा सवाल यावेळी करण्यात आला. कृषी विभागाकडे मोठी यंत्रणा असताना किती बंधारे बांधणार याचा अद्याप अहवाल का देत नाही तसेच पक्के बंधारे बांधण्यासाठी अद्याप सर्वेक्षण का केले नाही? प्रत्येक खाते ही सर्वच आमची जबाबदारी नाही असे म्हणून जबाबदारी झटकत असल्याने धोपावे, साखरी त्रिशूळ हे अशा कामाने टंचाईमुक्त घेऊ शकत नाहीत, असे सभापती राजेश बेंडल यानी स्पष्ट केले. २०६ पैकी १०९ शाळांमधून ई-लर्निंग व ६२ अप्रगत विद्यार्थ्यांविना शाळा असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी डी. डी. इरनाक यानी दिली. आरोग्य विभागांतर्गत कुटुंबकल्याण उद्दीष्ट ४२ टक्के पूर्ण असल्याची माहिती डॉ. सांंगवीकर यांनी दिली. या सभेत अन्य विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. अनेक विषयांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. यावेळी सभापती राजेश बेंडल, उपसभापती सुरेश सावंत, गटविकास अधिकारी बी. ई. साठे, सदस्य सुनील जाधव, विलास वाघे, पांडुरंग कापले, संपदा गडदे, गायत्री जाधव, पूनम पाष्टे, सुचना बागकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)