शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळला अॉक्टोपस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 11:13 IST

दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी या आधी अनेक वेळा दुर्मीळ सागरी जीवांचे दर्शन घडले असतानाच त्यात आता ऑक्टोपसचीही भर पडली आहे.

शिवाजी गोरे

दापोली (रत्नागिरी) - दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी या आधी अनेक वेळा दुर्मीळ सागरी जीवांचे दर्शन घडले असतानाच त्यात आता ऑक्टोपसचीही भर पडली आहे. तालुक्यातील लाडघर समुद्रकिनारी ऑक्टोपसचे दर्शन स्थानिक लोकांना घडले. यापूर्वी लाडघर समुद्रकिनारी ऑक्टोपस कधीही आढळल्याची नोंद नाही. ऑक्टोपस हा समुद्री जीव असून, ती समुद्र तळाशी राहणारी प्रजाती आहे. याला मराठीमध्ये अष्टपाद असे म्हणतात. आठ बाहू असणारा ऑक्टोपस हा जलचर प्राणी आहे.

ऑक्टोपस वंशामध्ये एकूण लहान मोठ्या 50 जाती आहेत. त्यामुध्ये लहानात लहान 2.50 सेमी तर मोठ्यात मोठी 9.7  मीटरची प्रजाती आढळते. हा प्राणी विशेषत: खोल समुद्रात राहत असला तरी तो उथळ भागामध्येही राहू शकतो. स्वसंरक्षण करण्यासाठी ऑक्टोपस शाईसारखा एक द्रव बाहेर टाकत असतो. त्याच्या शरीराची रचना गोलाकार, फुगवटा  असलेली  असते. त्याला डोळे आणि आठ प्रकारचे लांब हात असतात. हा जगातील महासागरामध्ये रहात असून, विशेषतः उबदार आणि उष्ण कटीबंध भागामध्ये राहतो. याला खोल समुद्रातील राक्षसही म्हटले जाते. 

ऑक्टोपसचे एरवी चित्रपट आणि संग्रालय यामध्येच दर्शन घडते. लाडघर समुद्रकिनारी डॉल्फीन माशांचे अधुमधून दर्शन घडत असते. त्यामुळे येथील समुद्रकिनार्‍याला पर्यटकांची अधिक पसंती आहे. मात्र, या डॉलफीनबरोबर अन्य दुर्मीळ सागरी जीवांचेही दर्शन घडू लागल्याने लाडघर समुद्रकिनार्‍याला पर्यटनाचा वेगळाच साज चढू लागला आहे. यामुळेच पर्यटकांची पसंती असणारा लाडघर समुद्रकिनारा हा पर्यटकांना पर्यटनाची साद घालणारा ठरत आहे. दापोली शहरापासून 7 कि.मी. अंतरावर लाडघर समुद्रकिनारा आहे. या किनारी दुर्मीळ ऑक्टोपसचे दर्शन घडल्याने स्थानिक तसेच पर्यटकांसह अनेकांनी ऑक्टोपसला पाहण्याची संधी सोडली नाही.