शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

आरक्षणासाठी ओबीसींचा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:07 IST

OBC Reservation, ratnagiri, collector office ओबीसींना आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल ओबीसी समाजातर्फे गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सनदशीर मार्गाने आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देआरक्षणासाठी ओबीसींचा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाआरक्षण बचाव आंदोलन, मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी निवेदन सादर

रत्नागिरी : ओबीसींना आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल ओबीसी समाजातर्फे गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सनदशीर मार्गाने आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले.ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. राज्यशासनाबरोबरच केंद्र शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. समाज वर्षानुवर्षे शासनाच्या विविध लाभांपासून वंचित आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ओबीसी आणि अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर शांततेत आंदोलन करण्यात आली. रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही हे आंदोलन झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध फलकांच्या माध्यमातून शासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठा जातीचे ओबीसीकरण नको, ओबीसींचा शासकीय सेवेतील अनुशेष भरावा व मेगा भरती त्वरीत करण्यात यावी, ओबीसींना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, आदिवासी जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण पूर्वरत करावे, ओबीसींच्या महाज्योती या संस्थेसाठी १००० कोटीची तरतूद करावी, आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधीची तरतूद करावी.

राज्यात १०० बिंदु नामावली लागू करावी, शासकीय सेवेतील ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे. ओबीसी शेतकरी, शेतमजूर व कारागिरांना ६० वर्षे वयानंतर पेन्शन योजना चालू करावी. आणि ओबीसी बहुजन कल्याण विभागाची कार्यालये प्रत्येक जिल्ह्यात सुरू करावीत. तसेच मंडल आयोगाची १०० टक्के अंमलबजावणी व्हावी, या आंदोलनाच्या मुख्य मागण्या आहेत.रत्नागिरीत अतिशय शांततेत आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी हे निवेदन स्वीकारले. या आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्यास ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा ओबीसी संघर्ष समन्वय समितीतर्फे या निवेदनात देण्यात आला आहे.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणRatnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी