शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आता अ‍ॅपवरून सांगा कुठलं पुस्तक हवंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 14:08 IST

literature, library, Ratnagirinews सरकार वाचनालये सुरू करण्यास परवानगी देत नसल्याने आता पुस्तके लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने हाती घेतला आहे. त्यासाठी वाचनालयाच्या अ‍ॅपवरून पुस्तकाची मागणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाचक प्रेरणा दिनापासून हा उपक्रम सुरू होत असल्याची घोषणा वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.

ठळक मुद्दे रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा नवा उपक्रम वाचनालयाच्या सभासदांना घरपोच मिळणार पुस्तक

रत्नागिरी : सरकार वाचनालये सुरू करण्यास परवानगी देत नसल्याने आता पुस्तके लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने हाती घेतला आहे. त्यासाठी वाचनालयाच्या अ‍ॅपवरून पुस्तकाची मागणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाचक प्रेरणा दिनापासून हा उपक्रम सुरू होत असल्याची घोषणा वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.कोरोनामुळे अद्याप वाचनालये बंद आहेत. वाचनालयांना परवानगी मिळाली तरी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना वाचनालयात येणे अशक्य आहे. त्यामुळे वाचनालयाने वाचकांसाठी घरपोच पुस्तके योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वाचक सभासदांसाठी त्यांच्या मागणीनुसार महिन्यातून दोन वेळा पुस्तक बदलून नवीन पुस्तक घरपोच दिले जाणार आहे.

जिल्हा नगर वाचनालयाचे अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेऊन त्या अ‍ॅपमधून वाचकांना हवे असणारे पुस्तक निवडून त्याचा क्रमांक वाचनालयात दूरध्वनीद्वारे अथवा मोबाईल द्वारे नोंदवता येईल. नोंदणी केल्यानंतर पुढच्या दिवशी अथवा सोयीनुसार संबंधित पुस्तक वाचकांना पाठविण्यात येणार आहे. जुने पुस्तक वाचकाने वाचनालयाच्या संबंधित पुस्तक घेऊन आलेल्या प्रतिनिधीकडे जमा केल्यानंतर नवीन पुस्तक वाचकाला उपलब्ध करून देण्यात येईल. महिन्यातून दोन वेळा पुस्तक बदलून देण्याची ही सेवा दिली जाणार आहे.

''घरपोच पुस्तक पोच योजनेबरोबरच काही डिजिटल आॅडिओ बुक्स सुविधा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. वाचनालयाच्या सर्वच उपक्रमांना वाचक सभासद भरघोस प्रतिसाद देतात. तसाच प्रतिसाद नव्याने सुरू होत असलेल्या योजनेलाही वाचक देतील, अशी अपेक्षा आहे.''अ‍ॅड. दीपक पटवर्धन, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय.

टॅग्स :libraryवाचनालयliteratureसाहित्यRatnagiriरत्नागिरी