शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीनंतर रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या कारखान्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 12:52 IST

प्लास्टिकच्या वापरावर राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर प्लास्टिक उत्पादन घेणाऱ्या उद्योगांवर गंडांतर आले आहे. प्लास्टिक बंदीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यभर प्लास्टिक उद्योगांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील ११, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ अशा एकूण १७ कारखान्यांना प्रस्तावित आदेशाच्या नोटीस बजावण्या आल्या आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी, १५ दिवसात म्हणणे मांडारत्नागिरीतील ११ व सिंधुदुर्गातील ६ कारखान्यांचा समावेश

रत्नागिरी : प्लास्टिकच्या वापरावर राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर प्लास्टिक उत्पादन घेणाऱ्या उद्योगांवर गंडांतर आले आहे. प्लास्टिक बंदीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यभर प्लास्टिक उद्योगांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील ११, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ अशा एकूण १७ कारखान्यांना प्रस्तावित आदेशाच्या नोटीस बजावण्या आल्या आहेत.शासनाने अलिकडेच राज्यात प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी जाहीर केली आहे. प्लास्टिक बंदीबाबत काही शिथिलता दिली आहे. प्लास्टिक बंदीबाबत शासनाने नव्याने दिलेल्या सूचना आणि त्यांची अंमलबजावणी प्लास्टिकचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांना बंधनकारक आहे. त्या दृष्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून या उद्योगांची तपासणी करून यावेळी काही आक्षेपार्ह आढळल्यास संबंधितांना प्रस्तावित आदेश काढून १५ दिवसांत आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने केलेल्या तपासणीत रत्नागिरीतील जीएमजी फुडस् अ‍ॅण्ड बेव्हरेज, ताम्हणकर इंडस्ट्रीज, डी. के. टेक्नॉलॉजी, नैवेद्यम डायनिंग प्रा. लि., तसेच चिपळूण खेर्डी एमआयडीसीतील मल्टीफिल्म प्लास्टिक प्रा. लि.चे दोन्ही उद्योग, मिस्टीकल टेक प्लास्टिक प्रा. लि., तसेच लोटे औद्योगिक वसाहतीतील श्री स्वामी इंडस्ट्रीज आणि गाणे-खडपोली एमआयडीसीतील आशू प्लास्टिक इंडस्ट्रीज अशा सहा कारखान्यांना शासनाच्या प्रस्तावित प्लास्टिकबंदी आदेशाबाबतच्या नोटीस देण्यात आल्या आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील श्री अ‍ॅक्वा प्युरिफायर प्रा. लि., कणकवली येथील भद्रकाली मिनरल वॉटर इंडस्ट्रीज, जाधव बेव्हरेज प्रा. लि., इपिक्युअर फुडस् अ‍ॅण्ड बेव्हरेज, वैभववाडी येथील श्री स्वामी समर्थ फुडस् यांनाही शासनाच्या प्रस्तावित प्लास्टिकबंदी आदेशाबाबतच्या नोटीस देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRatnagiriरत्नागिरी