शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

३ आणि ४ रूपयांचा मास्कच नाही, एन ९५ मास्कची किंमत सरसकट ४९ रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 15:22 IST

Coronavirus, mask, ratnagirinews राज्यात एन ९५ मास्क १९ ते ४९ रूपयांना तर दोन पदरी मास्क ३ रूपये आणि तीन पदरी मास्क ४ रूपये दराने विकण्यात यावेत, असे आदेश सरकारने काढले आहेत. याबाबतची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनाकडे दिलेली आहे. याबाबतची रिॲलिटी चेक केली असता, सर्रास औषधांच्या दुकानातून हे मास्क चढ्या किंमतीने विकले जात असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्दे३ आणि ४ रूपयांचा मास्कच नाही, एन ९५ मास्कची किंमत सरसकट ४९ रूपयेअन्य कापडी मास्कच्या दरावर अंकुश नाही

रत्नागिरी : राज्यात एन ९५ मास्क १९ ते ४९ रूपयांना तर दोन पदरी मास्क ३ रूपये आणि तीन पदरी मास्क ४ रूपये दराने विकण्यात यावेत, असे आदेश सरकारने काढले आहेत. याबाबतची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनाकडे दिलेली आहे. याबाबतची रिॲलिटी चेक केली असता, सर्रास औषधांच्या दुकानातून हे मास्क चढ्या किंमतीने विकले जात असल्याचे दिसून आले आहे.काही औषध विक्रेत्यांनी तर हे मास्क आपण अधिक दराने खरेदी केले असताना कमी दराने कसे विकणार, असा प्रश्न करत, आहे त्याच दराने विक्री करण्यास सुरूवात केली आहे. शहरातील ठराविक दुकानात एन ९५ मास्कचे दर प्रसिद्ध करण्यात आले असून, ते सरसकट ४९ रूपयांना विकत असल्याचे निदर्शनाला आले.एन ९५ विकला जातोय ४९ लायेथील औषध दुकानांमध्ये एन ९५ मास्क ४९ रूपयांना विकले जात असल्याचे सांगण्यात आले. तसेच दुपरी आणि तीन पदरी मास्कची किंमतही १० रूपयांपासून सुरू होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शासनाच्या निर्णयाबाबत माहिती असून, आपण त्या दरानेच मास्क विकत आहोत, असे या विक्रेत्याकडून सांगण्यात आले. दुकानाच्या प्रथमदर्शनी भागात विविध मास्कच्या किमतींचा बोर्ड लावलेला होता.मास्कच्या किमती चढ्या दरानेशासनाने निश्चित केलेल्या दरानुसार एन ९५ मास्कची किंमत कुठल्याही विक्रेत्याकडे १९ रूपये दिसत नाही. या विक्रेत्याने ४९ रूपयाचा ह्यएन ९५ह्ण मास्क हा यूज ॲड थ्रो असल्याचे सांगितले. मात्र, हा धुवून तीन - चारवेळा वापरता येतो, असे सांगितले. मात्र, काही विक्रेते काहीच माहिती न देता एन ९५ सांगताच ४९ रूपयांचा हा मास्क देत आहेत. दुपदरी तसेच तीन पदरी मास्कही सरसकट १५ ते २५ रूपये दराने विकले जात आहेत.कमी दरात कसे विकणार?शासनाने दर निश्चित केले असले तरी आम्हाला ते त्यापेक्षा जादा दराने खरेदी करावे लागले. मग, आम्ही ते कमी दराने कसे विकणार? आम्हाला हे मास्क संपेपर्यंत याच दराने विकावे लागणार, असे विक्रेत्याने सांगितले. त्यामुळे इतर दुकानांप्रमाणेच या दुकानातही एन ९५ मास्क ४९ रूपयाला तर दुपदरी आणि तीन पदरी मास्कची किंमत २० ते २५ रूपये असल्याचे सांगण्यात आले. इतर कापडी मास्कच्या किंमतीवरही कुठलाच अंकुश नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी