शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ डॉक्टर्सचा असहकार; रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:08 IST

वरिष्ठ डॉक्टरांच्या जाचाला कंटाळून ५ नवीन डॉक्टर्सनी राजीनामा दिला असून, १८ फेब्रुवारीला १ महिन्याची नोटीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे दिली आहे.

ठळक मुद्देवरिष्ठ डॉक्टर्सचा असहकार; जिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवररत्नागिरी जिल्हा रुग्णालय : ५ नवीन डॉक्टर्सनी दिली राजीनामा नोटीस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नवीन डॉक्टर्स व जुने डॉक्टर्स यांच्यातील वाद उफाळून आला. स्वतंत्र काम न पाहणाऱ्या नवीन डॉक्टर्सना काढून टाका, असा आग्रह धरीत वरिष्ठ डॉक्टर्सनी वैद्यकीय सेवा न देता असहकार पुकारला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयच व्हेंटिलेटरवर आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या जाचाला कंटाळून ५ नवीन डॉक्टर्सनी राजीनामा दिला असून, १८ फेब्रुवारीला १ महिन्याची नोटीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे दिली आहे.जिल्हा रुग्णालयात आधीच नवीन डॉक्टर्स येत नाहीत. असे असताना खासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या शासनाकडील पाठपुराव्याने जिल्हा रुग्णालयात २०१६ मध्ये ९ नवीन डॉक्टर्स रूजू झाले. त्यामधील ४ डॉक्टर्स स्वतंत्रपणे काम करतात.

५ नवीन डॉक्टर्स रुग्णालयात वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय सेवा देतात. मात्र, ते स्वतंत्र जबाबदारी घेण्यास घाबरतात. त्यांनी स्वतंत्रपणे काम करावे, असा हट्ट काही वरिष्ठ डॉक्टर्सनी धरला आहे. तसे जमत नसल्यास त्यांना काढून टाकावे, अशी मागणी त्या वरिष्ठ डॉक्टर्सनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे केली आहे. वरिष्ठ डॉक्टर्सच्या हट्टामुळे व नवीन डॉक्टर्सनी दिलेल्या राजीनामा नोटीसमुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फुले यांची कोंडी झाली आहे.रुग्णालयातील काही वरिष्ठ डॉक्टर्सकडे अपघात आणि स्पेशालिटी विभागाची जबाबदारी दिल्याने त्यांच्यावर कामाचा ताण पडत असल्याचे या डॉक्टर्सचे म्हणणे आहे.वरिष्ठ डॉक्टर्सचा जाच होत असल्याचे सांगत ९पैकी ५ नवीन डॉक्टर्सनी १८ फेब्रुवारीलाच आपल्या राजीनाम्याची नोटीस जिल्हा शल्यचिकित्सकांकडे दिली आहे. त्याला महिना पूर्ण व्हायचा आहे. सध्या ते डॉक्टर्स रुग्णालयात कार्यरत आहेत. असे असताना त्यांना काढून कसे टाकणार, असा सवाल डॉ. फुले यांनी वरिष्ठ डॉक्टर्सना केला आहे.रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे आधीचे जिल्हा चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांच्यावर दीड महिन्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई झाली. त्यानंतर डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. गेल्या महिनाभरात जिल्हा रुग्णालयातील कामकाज योग्यरित्या चालविण्याचा प्रयत्न डॉ. फुले यांनी केला आहे.

आता त्यांच्यासमोर नवीन डॉक्टर्स व जुने डॉक्टर्स असा वाद काहीजणांकडून निर्माण करण्यात आल्याची चर्चा रुग्णालय परिसरात आहे. डॉ. फुले यांच्या जिल्हाचिकित्सक म्हणून नियुक्तीलाच हे अप्रत्यक्ष आव्हान असल्याची चर्चा सुरू असून, यामागील सूत्रधाराच्या नावाचीही चर्चा होत आहे.आमदार उदय सामंत मार्ग काढणार?नव्या-जुन्या डॉक्टर्सच्या कलहामध्ये रुग्णालयातील वैद्यकीय सेवेवर गंभीर परिणाम झाला आहे. याप्रकरणी मार्ग काढण्यासाठी ७ मार्च रोजी आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत रुग्णालयात बैठक होणार असल्याची माहिती डॉ. फुले यांनी दिली आहे.वाद तातडीने मिटवावेत...जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्समध्ये सुरू असलेले वाद व त्यामुळे रुग्णसेवेवर झालेला गंभीर परिणाम पाहता हे वाद तातडीने मिटवावेत. त्यासाठी लोकप्रतिनीधी, जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी