शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

त्यांना विचार नाही, बाळासाहेबांचे पैसे हवे होते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सणसणीत टीका

By मनोज मुळ्ये | Updated: January 8, 2024 15:18 IST

'शिवसेनेच्या खात्यात असलेले ५० कोटी रुपये त्यांना हवे होते'

राजापूर : आमदार, खासदारांसह अनेकजण आमच्या मूळ शिवसेनेत आहेत. धनुष्यबाणही आपल्याकडेच आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी ही भूमिका घेतली. पण त्यांना बाळासाहेबांचे विचार नको होते. त्यांना बाळासाहेबांचे पैसे हवे होते. शिवसेनेच्या खात्यात असलेले ५० कोटी रुपये त्यांना हवे होते, अशी सणसणीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.राजापूरमध्ये आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात ते बोलत होते. अब की बार ४५ पार अशी घोषणाही त्यांनी केली. या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अनेकदा टीका केली.बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस पंतप्रधान करा, मी अयोध्येत राममंदिर बांधणे आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवणे हे दोन निर्णय लगेच घेईन. आता हे दोन्ही निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले आहेत. आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींची पाठ थोपटली असते. कौतुक केले असते. पण आता तसे होत आहे का? बाळासाहेबांचे स्वप्न ज्यांनी पूर्ण केले, त्यांच्यावर टीका करायचे काम सुरू आहे. टिंगल केली जात आहे.मंदिर वही बनाएंगे, लेकीन तारीख नही बताएंगे अशी चेष्टा करणार्यांना मोदींनी ते करुन दाखवले आहे आणि तारीखही सांगितली आहे. आता ते कॅलेंडर घेऊन तारीख शोधत बसले असतील, असा टोलाही शिंदे यांनी हाणला. ज्यांनी मंदिर बांधले त्यांच्यासोबत तुम्ही राहणार की जे मंदिरावरुन टिंगल करत आहेत, त्यांच्याबरोबर राहणार, असा प्रश्नही त्यांनी केला.केंद्र सरकारकडून राज्याला प्रत्येक योजनेसाठी निधी दिला जात आहे. याआधी अडीच वर्षे अहंकारापोटी केंद्राकडे निधी मागितलाच गेला नाही. त्यामुळे राज्य विकासात बरेच मागे गेले. जर आम्ही सत्तांतराचा निर्णय घेतला नसता तर राज्य कुठे गेले असते, असा प्रश्न करताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. जगभरात भारताला आदर मिळवून देण्याचे आणि भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम मोदी यांनी केले आहे, असे ते म्हणाले.उद्योगमंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला चांगली साथ दिली आहे. त्यांनी गेल्या दीड वर्षात भरीव काम केले आहे. आधीच्या अडीच वर्षात परदेशी गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र मागे पडला होता. मात्र उदय सामंत यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे गेल्या दीड वर्षात खूप मोठी गुंतवणूक राज्यात झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा वर आला आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे