शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांअभावी पाणी योजना रखडल्या-- निविदांना तीन वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदार मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:35 IST

तालुक्यातील  पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या निविदांना तीन वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरविली़ त्यामुळे तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा

ठळक मुद्देकोट्यवधीची कामे -तालुक्यातील पाणी पुरवठ्याची कामे कशी होणार

रत्नागिरी : तालुक्यातील  पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या निविदांना तीन वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरविली़ त्यामुळे तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा योजनांची कामे फक्त कागदावरच राहणार असून, कोट्यवधी रुपयांचा निधीही पडून राहणार आहे़

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा योजनांच्या लाखो रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या़ प्रत्येक गावातील वाडी - वस्त्यांमधील  घरापर्यंत पाणी यावे, यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करुन पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत़  त्यामध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, जलयुक्त शिवार, विंधन विहिरी व अन्य योजनांचा समावेश आहे.

ग्रामीण भागामध्ये अनेक गावातील वाड्यांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येक वर्षी पाणीटंचाई सुरु असते. ही टंचाई निवारण्यासाठी टंचाई कार्यक्रम तसेच देखभाल दुरुस्तीची कामे, आमदार निधीतून पाणी पुरवठ्याची कामे घेण्यात येतात़  रत्नागिरी तालुक्यामध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाची २४ कामे, टंचाई कार्यक्रमांतर्गत २५ कामे, जलयुक्त शिवारची १७ कामे,  देखभाल दुरुस्ती व आमदार निधीतून २० कामे अशी पाणी पुरवठ्याची कामे तालुक्यात करण्यात येणार आहेत़ 

यापैकी काही कामांसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून निविदा काढण्यात आल्या होत्या़ मात्र, या निविदा स्वीकारण्यास कोणीही ठेकेदार पुढे येत नसल्याने पाणी पुरवठा विभागाची मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणी पुरवठ्याची कामे कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे़

या कामांच्या निविदांना तीन वेळा मुदतवाढ देऊनही ती घेण्यासाठी ठेकेदारांनीच पाठ फिरविण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कामे केल्यावर कामांची रक्कम वेळेवर मिळत नाही वा अन्य कोणती कारणे आहेत का, अशी चर्चा सुरु झाली आहे़ या कामांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRatnagiriरत्नागिरी