शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: नवीन मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्प ४० वर्षे रखडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 19:10 IST

हर्षल शिरोडकर खेड : तालुक्यातील किंजळेतर्फ नातू, पुरे, तळे, कुडोशी व सुकिवली या पाच गावातील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी प्रस्तावित ...

हर्षल शिरोडकरखेड : तालुक्यातील किंजळेतर्फ नातू, पुरे, तळे, कुडोशी व सुकिवली या पाच गावातील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी प्रस्तावित असलेला नवीन मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्प तब्बल ४० वर्षे रखडला आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. धरणाच्या रखडलेल्या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यास या परिसरातील पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.

सन १९८३ साली या धरणाला मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली. मूळ धरण हे ४४५ मीटर व उंची ४९.४५ मीटर आहे. तर ओगी पद्धतीचा ९४ मीटरचा सांडवा प्रस्तावित आहे. २०.४३३ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाच्या निर्मितीमुळे पाच गावातील १८७७ हेक्टर जमीन पीक क्षेत्राखाली येणार आहे. धरणाला असणारा उजवा कालवा २१ कि. मी.चा असून, १ ते १० कि. मी.चा खुला कालवा आहे. त्यातील बहुतांशी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर ११ ते २१ मधील कामे पीडीएन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत.या धरणासाठी एकूण ११३.४० हेक्टर क्षेत्राची भूसंपादन कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी २९५.३४ लाख मोबदल्याचे वाटपही पूर्ण करण्यात आले आहे. या धरण क्षेत्रामुळे बाधित झालेल्या ८४ कुटुंबांना मौजे तळे आणि मांडवे येथे प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. पुनर्वसन ठिकाणी प्रकल्प बाधितांना देण्यात येणाऱ्या १८ नागरी सुविधांपैकी बऱ्याच सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे धरण पूर्णत्वाच्या मार्गातील अनेक अडथळे आता दूर झाले आहेत.धरणाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर

सध्या धरणातील घळभरणीचे काम पूर्ण करण्याचे मुख्य धोरण असून, सांडवा बार तसेच गाईड वॉल कालव्याचे (पीडीएन) काम पूर्ण करणे आवश्यक आहे. घळभरणीचे मुख्य काम पूर्ण झाल्यास धरणामध्ये पाणी साठवण सुरू होण्याची शक्यता आहे.वीज प्रकल्प प्रस्तावित

या धरणावर २ मेगावॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. त्या पद्धतीने धरणाची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे होणारी वीजनिर्मिती ही नजीकच्या गावांना मिळाल्यास गावातील भारनियमनाचा प्रश्न निकाली निघणार आहे. यासाठी करार केला जाणाऱ्या कंपनी आणि महावितरण विभाग यांनी तसा प्रस्ताव संबंधित गावच्या ग्रामपंचायतीकडे देण्याची गरज आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी