शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील नवीन अग्निशमन केंद्र शोभेचे?, कर्मचारी नियुक्तीबाबत शासनाची उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:13 IST

कोकणातील आगीच्या दुर्घटनांवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरीत सुमारे दोन एकर जागेवर अत्याधुनिक अग्निशमन केंद अर्थात फायर स्टेशन दोन वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाले आहे. दहा कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या अग्निशमन केंद्रासाठी अधिकारी व प्रशिक्षित कर्मचारी यांची गेल्या दोन वर्षात राज्याच्या उद्योग खात्याकडून नियुक्तीच झालेली नाही. त्यामुळे हे अग्नीशमन केंद्र सध्यातरी शोभेचे बनल्याची टीका होत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीतील नवीन अग्निशमन केंद्र शोभेचे?, कर्मचारी नियुक्तीबाबत शासनाची उदासिनता

रत्नागिरी : कोकणातील आगीच्या दुर्घटनांवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरीत सुमारे दोन एकर जागेवर अत्याधुनिक अग्निशमन केंद अर्थात फायर स्टेशन दोन वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाले आहे. दहा कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या अग्निशमन केंद्रासाठी अधिकारी व प्रशिक्षित कर्मचारी यांची गेल्या दोन वर्षात राज्याच्या उद्योग खात्याकडून नियुक्तीच झालेली नाही. त्यामुळे हे अग्नीशमन केंद्र सध्यातरी शोभेचे बनल्याची टीका होत आहे.मोठ्या शहरांप्रमाणेच आता कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बहुमजली इमारती उभारण्यासाठी शासनाने मंजूरी दिली आहे. तशा इमारती उभ्याही राहिल्या आहेत. मोठ्या शहरात बहुमजली इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास तत्काळ तेथील अग्निशमन दलातर्फे आग विझविण्यारी यंत्रणा घटनास्थळी दाखल होते व आग आटोक्यात आणली जाते. रत्नागिरीतही आता ६ व ७ मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. जिल्ह्याची वेगाने प्रगती होत आहे. अशावेळी उभारण्यात आलेल्या अग्नीशमन केंद्राच्या उदघाटनाबाबत शासनाची मात्र उदासिनता दिसून येत आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुमजली इमारतींबाबत जर अशी दुर्घटना घडली तर येथे अशी यंत्रणा आधी नव्हती. त्यासाठीच नारायण राणे यांनी उद्योगमंत्री असताना रत्नागिरीत ७७ गुंठे जागेत अत्याधुनिक अग्निशमन केंद्र अर्थात फायर स्टेशन उभारण्यासाठी १० कोटींचा निधी मिळवून दिला होता. त्यातूनच हे अग्निशमन केंद्र रत्नागिरीत २०१६ साली पूर्ण करण्यात आले आहे. या केंद्राचे काम पूर्ण व्हावे, यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनीही पाठपुरावा केला होता. मात्र केंद्र अत्याधुनिक असून दोन वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ७ औद्योगिक वसाहती आहेत. त्यासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र येथे अस्तित्वात नव्हते. म्हणून हे केंद्र आता उभारण्यात आले आहे. या केंद्रात हायड्रॉलिक शिडियुक्त दोन अग्निशमन बंब, १ अधिकारी, १२ फायरमन व अन्य मिळून २६ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची आवश्यकता आहे.

या केंद्राचा संपूर्ण कोकणला फायदा होणार आहे. ६ ते ७ मजली इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास या केंद्राची त्यात महत्वाची मदत होणार आहे. मात्र कर्मचारी नियुक्तीबाबत अद्यापही शासनाकडून कोणतीही हालचाल नसल्याने हे केंद्र सुरू होणार तरी कधी, असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :fireआगRatnagiriरत्नागिरी