शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणमधील राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या संपर्कात, शिंदेसेनेचा गळ रिकामा राहण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 19:21 IST

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात राजकीय उलथापालथ सुरू

चिपळूण : विधानसभा निवडणुकीत सक्रिय राहिलेल्या येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बड्या नेत्याने मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात राजकीय उलथापालथ सुरू असताना या बड्या नेत्याने भाजपची वाट धरल्याची चर्चाही जोरदारपणे सुरू आहे.गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांमध्ये पक्षप्रवेशाबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत. विशेषतः सत्ताधारी भाजप आणि शिंदेसेनेतच पक्षप्रवेशाची चढाओढ सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विभागात पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. चिपळुणातही अनेकजण त्यांच्या संपर्कात असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील तसेच उद्धवसेनेतीलही काहीजण शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.आता पक्षप्रवेशाबाबतीत भाजपही सक्रिय होऊ लागला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून भाजपने पक्षांतर्गत सक्रिय सदस्यपदाचा उपक्रम हाती घेतला आहे. जे कार्यकर्ते व पदाधिकारी सक्रिय आहेत, त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतले जात आहेत. मात्र, जे सदस्य सक्रियतेचा फॉर्म भरत नाही, त्यांना काही समित्यांवरून पायउतार केल्याचे प्रकारही येथे घडले आहेत.भाजपच्या संपर्कात चिपळूणचा बडा नेता असून, येत्या काही दिवसात या नेत्याचा पक्षप्रवेश मुंबई येथे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी या नेत्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. या नेत्याचा पक्षप्रवेश झाल्यानंतर संगमेश्वर विभागातील श्रद्धास्थान असलेल्या मार्लेश्वर देवस्थान येथून नव्या दमाने कामाला सुरवात केली जाणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.

शिंदेसेनेचा गळ रिकामा?या नेत्यासाठी शिंदेसेनेने गळ टाकला होता. बराच काळ त्यासाठी दोस्ती वाढवली जात होती. मात्र, आयत्यावेळी हा नेता शिंदेसेनेच्या गळाला न अडकला भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.