शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जोरदार हंगामा

By admin | Updated: October 6, 2015 22:43 IST

दोन्ही आमदार अनुपस्थित : पक्ष मोठा की आमदार, कार्यकर्ते गरजले

खेड : खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठकीत मंगळवारी जोरदार हंगामा झाला़ हमरातुमरीवर आलेले कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यातही कमी पडले नाहीत़ आमदार पक्ष कार्यकर्त्यांना सहकार्य करीत नाहीत तसेच संघटनेच्या बळकटीकरणासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचे सांगत हा पक्षशिस्तीचा भग असल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आला़ पक्षश्रेष्ठी संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष शेखर निकम आणि प्रदेश सरचिटणीस बाबाजी जाधव यांच्या उपस्थितीत झालेली ही बैठक वादळी झाल्याने आता खेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात कमालीची शांतता आहे.मंगळवारी दुपारी ३. २५ वाजता सुरू झालेली ही बैठक कोणत्याही ठोस निणर््ायाअभावी सायंकाळी ५ वाजता संपवण्यात आली़ या बैठकीला दोन्ही आमदार उपस्थित राहणे आवश्यक असताना ते उपस्थित नसल्याबाबत शिंदे यांनी सर्वांना धारेवर धरले. पक्ष चालवायचा कोणी आमदारांनी की कार्यकर्त्यांनी असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ यावर सर्व पदाधिकारी आणि पक्षश्रेष्ठी यांनी शांतच राहणे पसंत केले़ यावेळी भास्कर जाधव आणि बाबाजी जाधव यांच्या स्वतंत्र गटाचे या बैठकीत पुन्हा एकदा दर्शन झाले़ भास्कर जाधव गटाचे समर्थक मानले जाणारे युवकचे जिल्हाध्यक्ष राजू उर्फ बापू आंब्रे यांनी तर भास्कर जाधव यांच्यामुळेच खेड राष्ट्रवादी काँग्रेसला सुगीचे दिवस पहावयास मिळाल्याचे सांगितले़ यावर उपस्थित असलेल्या बाबाजी जाधव समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झाली़ यावर कडी करत बाबाजी जाधव यांचे समर्थक असलेले पंचायत समिती सदस्य सचिन दळवी यांनी मात्र हे साफ खोटे आहे, एकटे भास्कर जाधव यांनी काहीही केलेले नाही तर बाबाजी जाधव आणि संजय कदम यांनी मोठी मेहनत घ्ोतली असून, त्याच्यामुळेच पक्षाला खेडमध्ये चांगले यश मिळाल्याचे सांगितले़ सचिन दळवी यांच्या या वक्तव्यामुळे राजू आंब्रे आणि सचिन दळवी यांच्यामध्ये चांगलीच जुंपली़ सचिन दळवी यांनी तर भास्कर जाधव यांनी मंत्री असताना आपल्यावर कारवाई केल्याचे स्मरण करून देताच सभागृहामध्ये जोरदार खडाजंगी झाली. एक मंत्री पक्षाच्या माणसाविरोधात कारवाई कसा काय करू शकतो, असे स्पष्ट करीत भास्कर जाधवाविरोधात दळवी यांनी भूमिका मांडली. पक्षश्रेष्ठी संदेश कोंडविलकर आणि शेखर निकम यांनी देख्ीाल शांत बसणे पसंत केले़ (प्रतिनिधी)आमदार संजय कदमांना याबाबत विचारले असता त्यांनी मंडणगड येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण मंडणगडमध्ये असल्याचे सांगितले आहे़ याच कारणास्तव आपण बैठकीला येऊ शकलो नाही, असे सांगत आपण याबाबत पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचे कदम यांनी सांगितले़