असगोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांनी दिलेल्या दणक्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजविण्याची मोहीम राबविली आहे.
गेले काही दिवस शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते आणि अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे गुहागर शहराध्यक्ष कचरेकर यांनी कार्यकर्त्यांना घेऊन सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता निकम यांची भेट घेऊन शहरातील वेलदुर - गुहागर रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबद्दल चर्चा केली. रस्ते दुरुस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ खड्डे बुजविले. अभियंता नित्सोरे व उपअभियंता सलोनी निकम यांनी कामाची पाहणी केली. या वेळी मंदार कचरेकर हेही उपस्थित होते. त्यांनी बांधकाम विभागाचे आभार मानले.