शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आडिवरेतील देवी महाकालीचा उद्यापासून नवरात्रोत्सव, प्रति कोल्हापूर म्हणून ओळख 

By मनोज मुळ्ये | Updated: October 14, 2023 16:26 IST

राजापूर : प्रति कोल्हापूर म्हणून ओळख असलेल्या राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्री महाकाली मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून (१५ ऑक्टोबर) ...

राजापूर : प्रति कोल्हापूर म्हणून ओळख असलेल्या राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्री महाकाली मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून (१५ ऑक्टोबर) घटस्थापनेपासून प्रारंभ होणार आहे. उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त मंदिरावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.भक्तांच्या नवसाला पावणारी म्हणून आडिवरेतील श्री महाकालीची सर्वदूर ख्याती आहे. उत्सव काळात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून मंदिर व्यवस्थापनाकडून सज्जता करण्यात आली आहे. उत्सव काळात दररोज सकाळी ७ ते ११ या वेळात पूजापाठ, अभिषेक व महानैवैद्य, दुपारी ३ वाजता  घटाची आरती, सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत राजापूर येथील ह. भ. प. विद्याधर करंबेळकर यांचे कीर्तन, सायंकाळी ६:३० वाजता धुपारती, त्यांनतर रात्री ७ ते ८ या वेळात रत्नागिरी येथील वेदशास्त्र ओंकार मुळ्ये यांचे प्रवचन, रात्री ८ ते ९ या वेळेत सांगली येथील अभिषेक काळे यांचा गायन कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ ते १०:३० या वेळेत पालखी प्रदक्षिणा होईल. दररोजच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये रात्री ११ वाजता रविवारी, १५ रोजी बाळगोपाळा दशावतार, सोमवारी, १५ रोजी श्री वडेश्वर नमन मंडळ रूंढे तळी यांचे नमन, १६ रोजी दशावतार, १८ रोजी दशावतार, १९ रोजी शक्तीतुरा डबलबारी, २० रोजी गावखडी येथील नाटक होणार आहे. २२ रोजी रत्नागिरी येथील नमन मंडळ श्री रवळनाथ रिमिक्स लयभारी सादर होणार आहे. २३ रोजी शक्तीतुरा डबलबारीचा सामना, २४ रोजी दसरा साजरा केला जाणार आहे. दररोज सायंकाळी ६:३०  ते ९:३० वाजेपर्यंत विविध पारंपरिक कार्यक्रमांमुळे देवीचे दर्शन बंद राहणार असल्याचे देवस्थानतर्फे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNavratriनवरात्री