शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नाणार प्रकल्पाला सर्वांचाच विरोध नाही, निवेदनात समितीने केले नमूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 05:24 IST

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला १00 टक्के लोकांचा विरोध आहे, असे चित्र निर्माण केले जात असले, तरी आम्हाला प्रकल्प हवा आहे, अशी भूमिका अनेक ग्रामस्थ व व्यावसायिकांनी घेतली आहे.

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला १00 टक्के लोकांचा विरोध आहे, असे चित्र निर्माण केले जात असले, तरी आम्हाला प्रकल्प हवा आहे, अशी भूमिका अनेक ग्रामस्थ व व्यावसायिकांनी घेतली आहे. उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष द. म. सुकथनकर यांनी आपल्या निवेदनात ही बाब अधोरेखित केली आहे. जवळपास २0 टक्के लोकांनी आपली जमीन प्रकल्पाला देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.राजापूर तालुक्यातील नाणार, सागवे परिसरातील १४ गावांमध्ये आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील दोन गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी तीन पेट्रोलियम कंपन्यांनी एकत्र येऊन रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स कंपनी स्थापन केली आहे. या प्रकल्पाला सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे, असेच चित्र आतापर्यंत समोर येत होते. मात्र या प्रकल्पाला पाठिंबा देणारे ग्रामस्थही आहेत.सुकथनकर समितीच्या बैठकीच्या पहिल्या सत्रात अनेक संघटना, संस्थांचे लोक समितीला भेटून आपले म्हणणे सादर करून गेले. त्यात डॉक्टर्स, वकील, बागायतदार, व्यापारी, हॉटेल मालक, आयटीआय विद्यार्थी यांचा समावेश होता. त्यांनी दिलेल्या निवेदनांचा सूर हा प्रकल्प उभारणीस अनुकुल आणि समर्थनीय होता, असे सुकथनकर यांनी सांगितले.मात्र प्रकल्प ज्या गावांमध्ये येत आहे, तेथील ग्रामपंचायतींनी प्रकल्प नको, असे ठराव केले आहेत.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पRatnagiriरत्नागिरी