शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

गुहागर तालुक्यातील नक्षत्र वन धोक्यात

By admin | Updated: August 28, 2015 23:43 IST

वन विभागासमोर आव्हान : दोन हेक्टर चौरस फूट क्षेत्रावरील लागवड वाया

संकेत गोयथळे - गुहागर  जिल्हा नियोजन निधीमधून समुद्रकिनारी तब्बल दोन हेक्टर चौरसफूट क्षेत्रावर वन विभागामार्फत लागवड करण्यात आली होती. मात्र, वनामध्ये लागवड केलेल्या २ हजार ९६३ सेवांमधील अर्ध्याहून अधिक झाडे समूळ नष्ट झाली आहेत, तर काही कोमजलेली आहेत. यामुळे कायमस्वरुपी हे नक्षत्रवन भविष्यात चांगल्या स्थितीत टिकवून ठेवणे वन विभागासाठी आव्हानात्मक काम ठरणार आहे.एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा, असे सांगितले जाते. मात्र, लावलेली झाडे जोपासायची कुणी? असा सवाल केला जात आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे वनमंत्री तसेच पालकमंत्री असताना गुहागर समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकाधिक सुविधांसह विरंगुळा व माहितीसाठी १२ राशी, २७ नक्षत्रे व नक्षत्रांचे आराध्य वृक्ष यांच्या लागवडीचे नक्षत्रवन व्हावे, यासाठी जिल्हा नियोजनमधून २०१०-११मध्ये निधी उपलब्ध करुन दिला. गुहागर वन विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दोन हेक्टरमध्ये २ हजार ९६३ रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये एक हेक्टरमध्ये २ हजार ६०० सुरुची झाडे व एक हेक्टरमध्ये ३०८ औषधी वनस्पती व नक्षत्रवनामध्ये विविध ५५ रोपे लावण्यात आली.नक्षत्र वनामध्ये खैर, आवळा, नागकेशर, सावर, कुंचला, मोहा, शमी, कदंब, रुई, फणस, नीम, जांभूळ, पिंपळ, पळस, पायर आदी शास्त्रीयदृष्ट्या आवश्यक सर्व प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यामधील बेल, जाई व काही झाडेवगळता बहुतांश झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही, अशी स्थिती आहे. खासकरुन पावसाळ्यात जोराचा पाऊस व दमट हवामान यामुळे चार महिने झाडे कोमेजतात व त्यानंतर नोव्हेंबरनंतर पुन्हा त्यांना पालवी फुटते असे वनाधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. नर्सरीसाठी लावलेली बहुतांश झाडे मेली असून आता एकही झाड दिसत नाही. तसेच एक हेक्टरमध्ये लावलेल्या सुरुमधील समुद्री भरतीमुळे शेकडो झाडे सुरु उन्मळून समूळ नष्ट झालेली दिसत आहेत. नक्षत्र वनाच्या समुद्राकडील पाण्याच्या दिशेने पाण्याचा तडाखा बसू नये म्हणून लावलेली सुरूची बहुतांश झाडे उन्मळून पडल्याने भरतीचे पाणी थेट नक्षत्रवनामध्ये घुसत असल्याने ही अनेक झाडे मेली आहेत. अशी काही झाडे वन विभागाने पुन्हा लावली आहेत. मात्र, पुन्हा तीच स्थिती कायम राहिल्याने असणारी झाडे कशा प्रकारे जगवावीत हे आव्हान आहे.मे २०१५मध्ये केलेल्या पाहणी अहवालानुसार औषधी वनस्पती ९० टक्के, नक्षत्रवन ७१ टक्के व सुरूची झाडे ७९ टक्के अस्तित्त्वात असल्याची माहिती वनपाल राजश्री कीर यांनी दिली. मात्र, प्रत्यक्षात या पावसाळी हंगामानंतर एवढी झाडे आता अस्तित्त्वात नाहीत, असे चित्र आहे.