शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

‘नाईक फाऊंडेशन’ बनली गरिबांसाठी वरदायी

By admin | Updated: March 11, 2016 00:02 IST

समाज परिवर्तनाचा ध्यास : अवघ्या पाच मुलांना घेऊन सुरु झाली संस्था अन्.- लोकमतसंगे जाणून घेऊन

मेहरुन नाकाडे -- रत्नागिरी ढींूी, ऊ्र२ू्रस्र’्रल्ली & हङ्म१‘ या त्रिसूत्रीचा वापर करुन विचारांच्या आणि कृतीच्या माध्यमातून ‘एम. एस. नाईक फाऊंडेशन’ या शैक्षणिक संस्थेची स्थापना १९८५ साली करण्यात आली. अवघ्या पाच मुलांना घेऊन महंमद सिद्दीक नाईक व सईदा महंमद सिद्दीक नाईक या दाम्पत्याने संस्थेची स्थापना केली. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी इंंग्रजी माध्यमांची शाळा सुरु करुन संस्थेने समाज परिवर्तनाचा जणू काही ध्यासच घेतला होता.१९८५ साली रत्नागिरी जिल्हा हा शैक्षणिक व सामाजिक दृष्टीकोनातून वंचित समजला जात असतानाच नाईक दाम्पत्याने एम. एस. नाईक फाऊंडेशनच्याद्वारे लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. दरवर्षी शालांत परीक्षेचा १०० टक्के निकाल हे संस्थेचे वैशिष्ट्य आहे. बदलत्या काळानुसार स्मार्ट क्लासरुम, मॅथस् लॅब यासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर संस्थेने केला आहे. जनजागृती फेऱ्या, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धेचे आयोजन, एडस् जनजागृती रॅली, पल्स पोलिओ निर्मूलन, स्त्रीभ्रूण हत्या, जातीभेद, पर्यावरण वाचवा यासारख्या सामाजिक पश्नांवरही संस्थेकडून विविध उपक्रमांचे आयोजन वेळोवेळी केले जाते. सामाजिक व शैक्षणिक कार्याची नोंद घेत संस्थेला विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.सामाजिक परिवर्तनाचा व जाणीवेचा एक भाग म्हणून वंचित व समस्याग्रस्त महिलांसाठी कौटुंबिक सल्ला केंद्राची स्थापना संस्थेने केली आहे. गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक कालावधीमध्ये समुपदेशनाद्वारे उभयतांमध्ये कौटुंबिक सलोखा राखण्याचे कार्य संस्थेकडून सुरु आहे. विनाशुल्क हे काम सुरु असून, हजारो कुटुंबे विभक्त होण्यापासून वाचविण्याचे श्रेय संस्थेला आहे. सामाजिक समस्येबरोबरच महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, कायद्याची माहिती तसेच विधी साक्षरता शिबिराचे आयोजन संस्थेतर्फे वेळोवेळी करण्यात येत आहे. समस्याग्रस्त व्यक्तींना स्वत:च्या पायावर आत्मविश्वासाने पुन्हा उभे करण्यासाठी संस्था कार्यरत राहिली आहे. महिला बचत गटासारखी संकल्पना फक्त पैशाची बचत करण्याकरिता मर्यादित न ठेवता सामाजिक संस्थांच्या मदतीने इच्छुक महिलांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा संस्थेने नवा आदर्श घालून दिला आहे. महिला सक्षमीकरण कागदोपत्री न करता प्रत्यक्षात महिला सबलीकरणासाठी संस्थेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.बालकांचा केवळ विकास न करता त्यांचे संरक्षण करणेदेखील तितकेच गरजेचे आहे. याच दृष्टीकोनातून केंद्रीय महिला बालविकास, नवी दिल्ली, भारत सरकार यांच्या एकात्मिक बालसंरक्षण कार्यक्रमांतर्गत ५ मे २०११ पासून ‘चाईल्ड लाईन’ ही राष्ट्रीयस्तरावरील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी आणि विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी २४ तास मदत करणारी हेल्पलाईन जिल्ह्यासाठी सुरु करण्यात आली आहे. हेल्पलाईनच्या माध्यमातून बाल कामगार, भरकटलेली मुले, भीक मागणारी मुले, रस्त्यावर राहणारी मुले, कौटुंबिक कलहात सापडलेली मुले, शारीरिक व लैंगिक अत्याचारास बळी पडलेली मुले यांची योग्य ती निकड ओळखून मदत करण्याचे आणि त्यांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी करण्याचे काम हेल्पलाईनच्या माध्यमातून सुरु आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बालकामगार समितीची स्थापना करण्यात आली आहे. शेकडो बालकांच्या समस्या या माध्यमातून सोडविण्यात येऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.संस्थेला मिळालेले पुरस्कार सावित्रीबाई फुले पुरस्कार (२००५-०६).अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (२००९-१०).साने गुरूजी गुणवत्ता विकास अभियानांतर्गत (२००६ पासून सलग तीन वर्षे) विशेष पुरस्कार.अमेरिकन कौन्सिलिस्ट, मुंबईतर्फे आयोजित अमेरिका शिक्षण दौऱ्यात संस्थेच्या संस्थापिका सईदा नाईक यांची निवड.बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार नवनवीन शैक्षणिक बाबींचा समावेश आणि समाजाच्या सामाजिक समस्या ओळखून एम. एस. नाईक फाऊंडेशनची वाटचाल सुरू आहे. फाऊंडेशनच्या शैक्षणिक संकुलातंर्गत दोन हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विनाअनुदानित तत्वावर संस्था चालवत असताना विविध समस्यांना समोरे जावे लागते. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून केजी ते बारावीपर्यंतचे शिक्षण एका छत्राखाली देण्याची व्यवस्था सुरू केली आहे. एवढंच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी कालशेकर ट्रस्टतर्फे अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.- महंमद सिद्दीक नाईक, संस्थाध्यक्ष, एम. एस. नाईक फाऊंडेशन, रत्नागिरी.