शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

नाचणी वरीचे क्लस्टर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन करावे : अनुप कुमार

By मेहरून नाकाडे | Updated: February 25, 2024 20:20 IST

रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी विविध कृषि योजनांचा आढावा घेतला.

रत्नागिरी : मसाला पिकांचे क्षेत्र वाढ होण्यासाठी एमआरजीएस अंतर्गत मोठ्या प्रमाणावर लागवड करावी. ‘अॅग्रो टूरिझम’ च्या माध्यमातून ‘स्पाइस गार्डन’ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. पाणी फाऊंडेशन सारख्या उत्कृष्ट प्रतीच्या शेतीशाळा झाल्या पाहिजेत. भाटे संशोधन केंद्राने विकसित केलेली लाखी बाग शंभर टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. आंतरराष्ट्रीय पाैष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मिलेट नाचणी-वरी पिकाचे ‘क्लस्टर प्रोजेक्ट’ प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी ‘मिलेट मॅपिंग’ करावे. तसेच क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करण्याची सूचना कृषि व पदुम विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केली.रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी विविध कृषि योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी उत्पादन वाढीबाबत सूचना केल्या. बैठकीनंतर प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, संशोधन केंद्र शिरगांव, मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथे भेट देवून नवीन संशोधनाबाबत माहिती घेतली.पीएमएफएमई अंतर्गत मत्स्य प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत घेण्यात यावे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फणसाला मोठ्या प्रमाणावर प्रचंड मागणी आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये फणस मिशन अंतर्गत फणसाचे सुद्धा क्लस्टर प्रोजेक्ट तयार करण्याची सूचना केली. यावेळी,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा ‘आत्मा’प्रकल्प संचालक आत्मा जालिंदर पांगरे, कृषि उपसंचालक तथा ‘स्मार्ट’चे नोडल अधिकारी अजय शेंडे,उपविभागीय कृषि अधिकारी नानाजी भोये, कृषि पर्यवेक्षक बापुराव शेंडगे उपस्थित होते. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी