शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीतील डॉल्फिनच्या मृत्यूचे गूढ, एकाच महिन्यात दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 18:09 IST

दापोली तालुक्यातील हर्णै नवानगर येथे पुन्हा एकदा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत सापडल्याने डॉल्फिनच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा डॉल्फिन मासा मृत आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तालुक्यात तिसऱ्यांदा मृतावस्थेत डॉल्फिन आढळला आहे.

ठळक मुद्देदापोलीतील डॉल्फिनच्या मृत्यूचे गूढएकाच महिन्यात दुसरी घटना

दापोली : तालुक्यातील हर्णै नवानगर येथे पुन्हा एकदा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत सापडल्याने डॉल्फिनच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा डॉल्फिन मासा मृत आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तालुक्यात तिसऱ्यांदा मृतावस्थेत डॉल्फिन आढळला आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील सालदुरे - पाळंदे समुुद्रकिनारी डॉल्फिन मासा मृत अवस्थेत सापडला होता. ही बाब ग्रामस्थांनी वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृत डॉल्फिनला समुद्रकिनारीच खड्डा करून पुरून टाकले होते. ही घटना ताजी असतानाच रविवार, ३ मे रोजी दुसरा मृत डॉल्फिन किनाऱ्याला आल्याचे दिसले.एकाच आठवड्यात दोन डॉल्फिनचा एका समुद्रकिनारी मृत्यू ओढवल्याने तर्क वितर्क लढवले जात होते. हा डॉल्फिनदेखील कुजलेल्या अवस्थेत असल्याने तेथेच खड्डा काढून पुरला. यावेळी हर्णै परिसरातील ग्रामस्थ, सर्पमित्र प्रीतम साठविलकर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी गुहागर येथील समुद्रकिनारीदेखील मृत डॉल्फिन सापडला होता.दापोली व गुहागरात मृतावस्थेत डॉल्फिन आढळत असल्याने चिंतेची बाब बनली आहे. डॉल्फिनचा मृत्यू नेमका कशामुळे होत आहे, याचा शोध घेण्यात अद्यापही वन विभागाला यश आलेले नाही. त्यामुळे मृत्यूचे कारण गुलदस्त्यात आहे.तिसरी घटनाएकाच महिन्यात केवळ २० दिवसांनी पुन्हा एकदा हर्णै-नवानगर येथे डॉल्फिन मृत अवस्थेत सापडला. दापोलीत मृत डॉल्फिन किनाऱ्यावर सापडण्याची या दोन महिन्यातली ही तिसरी घटना आहे. अंदाजे दोन ते तीन दिवसांपूर्वीच हा डॉल्फिन किनाऱ्याला लागला असावा, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. 

टॅग्स :dapoli-acदापोलीfishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी