शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - गोवा महामार्ग : गणपतीपूर्वी महामार्गावरील खड्डे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 15:55 IST

मुंबई - गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने भरण्याचे काम सुरू झाले असून, ते गणेशोत्सवापूर्वी पुर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकशाही दिनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देमुंबई - गोवा महामार्ग : गणपतीपूर्वी महामार्गावरील खड्डे भरणारजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

रत्नागिरी : जिल्ह्यात आता गणेशोत्सवासाठी होणारी भक्तांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई - गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने भरण्याचे काम सुरू झाले असून, ते गणेशोत्सवापूर्वी पुर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकशाही दिनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे उपस्थित होते.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या उपस्थितीत पहिलाच जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता. त्याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. महामार्गावरील खड्ड्यांची जिल्हाधिकारी चव्हाण यांनी २२ व ३१ रोजी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात संबंधित विभागांना हे खड्डे भरण्याच्या तातडीने सूचना दिल्या. त्यानुसार आता हे खड्डे भरण्यात आल्याने महामार्गावर नक्की फरक पडेल, असे ते म्हणाले.तसेच आता पाऊस कमी झाला असून, हे काम मार्गी लागेल तसेच यापुढे सातत्याने खड्डे भरण्याची प्रक्रिया सुरू राहील, पाऊस थांबताच काम अधिक गती घेईल, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, येत्या ८ रोजी बांधकाम राज्यमंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यावेळी हे खड्डे भरण्याचे काम बहुतांश पूर्ण झालेले असेल, असे ते म्हणाले.आजच्या लोकशाही दिनात सात विभागांसंदर्भात एकूण २२ अर्ज आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महसूल विभागाचे ४, जिल्हा परिषद ८, पोलीस अधीक्षक २, नगरपालिका ४, सहनिबंधक कार्यालय १, भूमी अभिलेख २, बांधकाम विभागासंदर्भात १ अशा अर्जांचा समावेश आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी