शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - गोवा महामार्गावर खड्ड्यांनी अडवली चाकरमान्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:27 IST

गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी गौरी - गणपतींचे विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर रविवारी सकाळी वाहनांची कोंडी झाली होती. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्दे जगबुडी पुलावर वाहनांच्या लांबच रांगा चाकरमानी परतीच्या प्रवासाला

खेड : गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी गौरी - गणपतींचे विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर रविवारी सकाळी वाहनांची कोंडी झाली होती. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असतानाही ई-पास, मेडिकल तपासणी, क्वारंटाईन आदी अडथळे पार करून बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक चाकरमानी आपल्या कुटुंबासह कोकणात दाखल झाले होते. गौरी - गणपतीला निरोप दिल्यानंतर चाकरमानी पुन्हा मुंबईला परतू लागले आहेत. त्यामुळे गेले काही महिने शुकशुकाट असलेल्या महामार्गावर वाहनांची वर्दळ पुन्हा एकदा वाढली आहे.गेले काही दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांच्या वेगालाही ब्रेक लागत असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे.

महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला खड्डे पडल्याने या ठिकाणी वाहने नेताना चालकांचा कस लागत आहे. जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्याचे काम रविवारी सकाळी सुरू होते. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.जोडरस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्यावर वाढलेली वाहनांची वर्दळ यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला पडलेले खड्डे संबंधित ठेकेदाराकडून तत्काळ बुजवून घ्यावेत, अशी मागणी चालक आणि प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग