शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद विरोधात रत्नागिरीत धरणे आंदोलन

By अरुण आडिवरेकर | Updated: October 20, 2022 18:34 IST

कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात झाल्यास येथील दुर्गम भागातील अनेक शाळा बंद होतील.

रत्नागिरी : शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात एक जरी विद्यार्थी शाळेत शिकत असेल तरी ती शाळा बंद करू नये, या मागणीसाठी गाव विकास समितीने आज, गुरुवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. गाव समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुर्गम भागात शाळा आहेत. यातील अनेक शाळांचा पट हा ० ते २० च्या मध्ये आहे. कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात झाल्यास येथील दुर्गम भागातील अनेक शाळा बंद होतील. त्यामुळे गाव खेड्यातील, दुर्गम भागातील सामान्य विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल, असे गाव विकास समितीने जिल्हाधिकारी यांना आंदोलनादरम्यान दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कमी पटसंख्या असली तरी दुर्गम भागातील शाळा बंद होऊ नयेत अशी आमची भूमिका असून, हीच भूमिका येथील विद्यार्थी व पालकांची आहे, असे गाव विकास समितीने म्हटले आहे.यावेळी सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे, जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर, जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी, रत्नागिरी जिल्हा संघटक मनोज घुग, तालुका संघटक सुकांत पाडाळकर, संगमेश्वर तालुका संघटक प्रशांत घुग, ग्रामीण विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष दैवत पवार, सदस्य नितीन गोताड, महेंद्र घुग, शुभम गोरुले उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळा