शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

अनाथांची माय, सिंधुताईचा कष्टप्रद प्रवास देखाव्यात उमटला, रत्नागिरीतील मयूर भितळे यांचा दीड महिन्यापासून प्रयत्न

By शोभना कांबळे | Updated: September 23, 2023 19:12 IST

चलचित्र देखावा परिसरात ठरतोय आकर्षण 

रत्नागिरी : कोकणचे लाडके दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव उत्साहात साजरा होतो. गणेशोत्सव सामाजिक प्रबोधनाचे उत्तम व्यासपीठ आहे. त्यामुळे सध्या या उत्सवाचे औचित्य साधून काही ठिकाणी देखाव्याच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी संदेश दिले जात आहेत. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील मयूर सुरेश भितळे या तरुणाने अनाथांची माय झालेल्या दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाच्या प्रवासातील चार कष्टप्रद प्रसंगावर आधारित चलचित्र देखावा साकार केला आहे.सिंधुताई सकपाळ यांनी अगदी लहान वयापासून कष्ट उपसले. लहान वयात विवाह झाला, पण सुखाऐवजी नशिबात दु:खच आले. चारित्र्यावर संशय घेऊन दिवस गेलेले असतानाच जोडीदाराने मारहाण करून घराबाहेर काढले. डोक्यावरचे छतच गेल्याने एका गोठ्यात मुलाला जन्म दिला. स्मशानभूमीत जळत असलेल्या चितेच्या उजेडात रात्र घालवली आणि पोटातील भुकेची आग शमविण्यासाठी त्या अग्नीवर पिठाचा गोळा ठेवून भाकरी भाजली. आपल्या मुलीच्या आयुष्यात आपल्यासारखे कष्ट नको यायला, म्हणून एका सहृदयी कुटुंबाकडे तिला सुपूर्द करून त्या महाराष्ट्रातील अनाथ मुलांची माय झाल्या.

त्यांच्या या प्रमुख चार कष्टप्रद घटनांवर आधारित चलचित्र देखावा मयूर भितळे यांनी केला आहे. सिंधुताईच्या कष्टप्रद जीवनाला केंद्रीय स्थानी ठेवून भितळे यांनी केलेला हा चलचित्र देखावा पाहताना त्यांच्या जीवनाचे चित्र समोर उभे राहाते. हा देखावा २८ सप्टेंबर, अनंत चतुर्थीपर्यंत पाहण्यासाठी खुला राहाणार आहे.

दीड महिन्यापासून प्रयत्नमयूर भितळे इलेक्ट्रिशियन आहेत. गेली पाच वर्षे ते विविध विषयांवर देखावे सादर करीत आहेत. गोवर्धन पर्वत, शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू यांना पावनखिंडीत ठेवून विशाळगडाकडे केलेली कूच, नारळातील गणपती आदी देखावे केले आहेत. चलचित्र देखावा त्यांनी दीड महिन्याच्या प्रयत्नातून यंदा पहिल्यांदाच केला. यासाठी त्यांना साैरभ मयेकर, स्वाती सोनार, साहिल मयेकर, अभिजीत आलीम आणि ध्वनी संकलानासाठी संदीप पावसाकर, शुभम शिवलकर यांचे सहकार्य मिळाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सव