शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकावर मोफांतर्गत गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:44 IST

सुमारे १८ वर्षे जुन्या असलेल्या डॉन रेसिडेन्सी या इमारतीतील रहिवाशांनी सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्याची व अभिहस्तांतरणाबाबत अनेकदा मागणी करुनही त्यास टाळाटाळ करुन दुर्लक्ष केल्याप्रकरणी येथील एका बांधकाम व्यावसायिकावर मोफा (महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटस् अ‍ॅक्ट) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबांधकाम व्यावसायिकावर मोफांतर्गत गुन्हामागणी करुनही टाळाटाळ करुन दुर्लक्ष

चिपळूण : सुमारे १८ वर्षे जुन्या असलेल्या डॉन रेसिडेन्सी या इमारतीतील रहिवाशांनी सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्याची व अभिहस्तांतरणाबाबत अनेकदा मागणी करुनही त्यास टाळाटाळ करुन दुर्लक्ष केल्याप्रकरणी येथील एका बांधकाम व्यावसायिकावर मोफा (महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटस् अ‍ॅक्ट) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लियाकत अली शमशुद्दिन कासकर (६५, रा. पाग कासकरआळी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद तानू काशिराम आंबेकर (रा. डॉन रेसिडेन्सी) यांनी दिली आहे. आंबेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सिटी सर्व्हे नं. ६३४१ (अ) २ या महसूल भूमापन क्रमांकावर डॉन रेसिडेन्सी ही इमारत बांधण्यात आली आहे.

या इमारतीत १४ सदनिकाधारक असून, तळमजल्यावर आठ दुकान गाळ्यांचा समावेश आहे. त्याची विक्री होऊन अनेक वर्षे झाली आहेत. या मिळकतीचे मूळ कागदपत्र, कुलसुमबी इस्माईल देसाई व लियाकत अली शमशुद्दिन कासकर यांचे खरेदीखत, इमारतीचा प्रमाणित नकाशा, प्रॉपर्टी कार्डचा उतारा व बांधकाम परवाना आणि भोगवटा वापर प्रमाणपत्र आजतागायत कासकर यांच्या ताब्यात आहेत.

या मिळकतीतील सदनिकाधारक व गाळेधारक यांची सहकारी गृहनिर्माण सोसायटी करून हस्तांतरण करण्याची मागणी करण्यात आली होती. कासकर यांनी जाणीवपूर्वक ही मिळकत आजतागायत आपल्या ताब्यात ठेवली आहे.

दरम्यान, सोसायटी व अभिहस्तांतरण करण्याबाबत वारंवार विनंती करण्यात आली. त्यांनी आजतागायत त्याची पूर्तता केली नाही. याप्रकरणी या बांधकाम व्यावसायिकावर मोफा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मन्सूर मणेर करीत आहेत.या इमारतीसाठी सहकारी गृहनिर्माण सोसायटी होण्याबाबत आंबेकर यांनी प्रयत्न करुनही सहकारी संस्था सहनिबंधकांकडे २०१४मध्ये प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, या प्रस्तावाला कासकर यांनी अनुमती देण्यास नकार दिला. त्यामुळे हा प्रस्ताव परत आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी