लांजा : तालुक्यात साेमवारी कोरोनाचे एकूण २९ रुग्ण आढळले. यामध्ये रॅपिड कोरोना चाचणीत ४ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
तालुक्यात सोमवारी करण्यात आलेल्या अँटिजन चाचणीत ४ जण तर आरटीपीसीआर चाचणीत २१ जणांचा असा एकूण २५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाकेड भितळेवाडी १, वेरवली खुर्द बोडसवाडी १, केळंबे माळवाडी ५, कोर्ले १, प्रभानवल्ली २, आगवे गुरववाडी १, लांजा शहर १, लांजा न्हावीवाडी ४, पूनस कडूवाडी १, लांजा धावणेवाडी १, लांजा आगरगाव १, भांबेड कुडेवाडी २, पूनस गुरववाडी १, खावडी कोतवडेकरवाडी १, लांजा महिलाश्रमशेजारी १, लांजा गोंडेसखल रोड १ तर शहरामध्ये फिरणाऱ्या ३९ जणांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तिघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत तर ४५ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते, त्यामधून एकाचा आरटीपीसीआर अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.