शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर १००पेक्षा अधिक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:49 IST

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातांपेक्षा गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या कमी असली तरी १००पेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. दीड हजारपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत अपघातांची व त्यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम अधिक वेगाने व्हावे, ही कोकणवासीयांची मागणी आहे.

ठळक मुद्देदीड हजार जखमी : ‘डेड ट्रॅक’ची प्रतिमा पुसण्यात अद्याप अपयशचौपदरीकरण : काम लवकर होणे अपेक्षित

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातांपेक्षा गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या कमी असली तरी १००पेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. दीड हजारपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत अपघातांची व त्यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम अधिक वेगाने व्हावे, ही कोकणवासीयांची मागणी आहे.गेल्या चार वर्षांच्या काळात मुंबई - गोवा महामार्गावर दरवर्षी एक हजारपेक्षा अधिक अपघात झाले, त्यामध्ये दीडशेपेक्षा अधिक प्रवाशांचे बळी गेले होते. त्या तुलनेत जानेवारी २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत पनवेल ते कसाल या ४५० किलोमीटर अंतराच्या महामार्गावर ८९१ अपघात घडले. त्यामध्ये १११पेक्षा अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर या अपघातांमध्ये दीड हजार प्रवासी जखमी झाले. त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.मुंबई - गोवा महामार्गावर २०१०पासून २०१६ सालापर्यंत अपघातांची संख्या एक हजार ते दीड हजारच्या दरम्याने कायम राहिली आहे. त्यामध्ये प्रतिवर्षी सरासरी दीडशे ते दोनशे प्रवासी प्राणाला मुकले आहेत. ही स्थिती बदलावी व या महामार्गाची मृत्यूचा सापळा अशी बनलेली प्रतिमा बदलावी, म्हणून दोन दशकांपासून चौपदरीकरणाची मागणी सुरू होती. २०१३मध्ये मंजूर झालेल्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे दीड वर्षापूर्वी निवळी येथे उद्घाटन झाले होते. परंतु २०१८ मध्ये खºया अर्थाने चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. मात्र, २०१३ व त्याआधीपासूनही चौपदरीकरण होणार आहे म्हणून अस्तित्त्वात असलेल्या महामार्गाच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. त्यामुळे गेल्या पाच ते सात वर्षांमध्ये महामार्गाची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. ही स्थिती अजूनही कायम आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रुंदीकरणाची जागा मोकळी करून घेतली जात आहे. संपूर्ण महामार्गावर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये चौपदरीकरणाच्य कामाने वेग घेतला आहे. तरीही चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, या काळात जुन्या रस्त्यावरील खड्डे, खराब रस्त्याच्या ठिकाणी पॅचवर्क करणे आवश्यक आहे. चौपदरीकरणानंतर अपघात कमी होतील, अशी अपेक्षा अन्य महामार्गांच्या झालेल्या चौपदरीकरणानंतर व्यक्त झाली होती. परंतु ७० ते ८० प्रतितास वेगामुळे तेथेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे.चौपदरीकरण : काम लवकर होणे अपेक्षितमागील चार वर्षात महामार्गावर दरवर्षी हजारपेक्षा अधिक अपघात.दरवर्षी महामार्गावरील अपघातात दीडशे ते २००च्या दरम्याने प्रवासी मृत्यूमुखी.जानेवारी २०१७ ते जानेवारी २०१८ या वर्षभरात पनवेल ते कसाल मार्गावर ८९१ अपघात; १११पेक्षा अधिक बळी.२०१३ ते २०१६ या वर्षीपेक्षा गतवर्षी अपघातांच्या प्रमाणात झाली घट.महामार्गाचे चौपदरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा.वाहतूक नियम पाळावेतमहामार्गावरील अपघातांचे प्रमाण पाहता रस्ते खराब झाल्याने अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु मानवी चुकांमुळेही अपघात वाढले आहेत. वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाहतूक नियमांचा सतत भंग होत असल्याने हे नियम पाळणे अत्यावश्यक झाले आहे.