शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरातील कोदवलीत सापडली एकपाषाणी शैव गुफा मंदिरे, वाकाटक राजवटीच्या काळातील असल्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:33 IST

६ व्या शतकातील ही शैव गुफा मंदिरे जंगल झाडीने वेढलेली आहेत.

विनोद पवारराजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणाजवळ नदीच्या बाजूला चार शैव गुफा मंदिरे सापडली आहेत. ही मंदिरे वाकाटक राजवटीच्या काळातील असल्याचा अंदाज काही इतिहासकारांनी वर्तवला आहे. कोदवली येथील शिवाजी कुंभार व विनोद पवार यांना ही गुफा मंदिरे सापडली आहेत. ६ व्या शतकातील ही शैव गुफा मंदिरे जंगल झाडीने वेढलेली आहेत.वाकाटक राजवट भारताच्या दक्षिण भागात तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत अस्तित्वात होती. विंद्यशक्ती हा राजा या वाकाटक साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. वाकाटक साम्राज्यात एकशिळा मंदिरे व गुफा मंदिरे यांच्या वास्तुकलेला प्रोत्साहन दिले गेले हाेते. कोदवली येथे सापडलेली शैव पंथीय गुफा मंदिरे ही राजापूरच्या प्राचीनतेचे महत्त्व अधोरेखित करणारी आहेत. राजापूर बंदरातून कोदवली मार्गे गोड्या नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरून या साम्राज्याचा राजमार्ग असल्याच्या त्या खुणा असल्याचा इतिहास अभ्यासकांचा अंदाज आहे.

कशा आहेत या गुफा ?

  • कोदवली धरणाच्या खालच्या बाजूला साधारण ५०० मीटरच्या अंतरावर ही गुफा मंदिरे आहेत. ती शैवपंथीय असल्याचे त्यांच्या रचनेवरून दिसते. या गुफांमधील एका एकपाषाणी मंदिराचे प्रवेशद्वार तीन फूट रुंद व पाच फूट उंच आहे. आतील भाग हा साधारण आठ फूट लांब व सहा फूट रुंद आहे, तर उर्वरीत तीन मंदिरे छोटी आहेत. येथील काही पाषाणांवर अर्धवट कोरलेली मंदिरेही आहेत.
  • प्रत्येक गुफा मंदिरात एक चौथरा असून, एका मुख्य व मोठ्या गुफा मंदिरातील या तीन फूट रुंद व चार फूट लांब असणाऱ्या त्या चौथऱ्याला वरून खालपर्यंत जाणारे एक छिद्र आहे. हा संपूर्ण गुफा मंदिर परिसर ‘लॅटराइट’ दगडाचा आहे. एका गुफा मंदिराची उंची साधारण तीन फूट आहे, तर आतील भाग तीन फूट लांब व दोन फूट रुंद आहे. तीन नंबरच्या गुफा मंदिराचा आतील भाग चार फूट लांब, तर तीन फूट रुंद आहे. सध्या हे एकपाषाणी गुफा मंदिर पाण्याने भरलेले आहे. चौथे एकपाषाणी गुफा मंदिर अर्धवट स्थितीत कोरलेले आहे.

शंकरेश्वर मंदिराजवळही मंदिरकोदवली नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या शंकरेश्वराच्या मंदिरालगत अजून एकपाषाणी मंदिर आहे. त्यामध्ये शिवलिंग स्थापित आहे. हे एकपाषाणी मंदिरही वाकाटक राजवटीतील असल्याचे मानले जाते.