शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १५ महिन्यांनी तिवरेवासियांच्या पुनर्वसनाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:50 IST

chiplun, tiwre, dam, ratnagirinews चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेनंतर तब्बल १५ महिन्यांनी बाधितांच्या पुनर्वसन वसाहत कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुंबईतील सिध्दिविनायक ट्रस्टने मंजूर केलेल्या एकूण ११ कोटी रुपयांच्या निधीतून प्रथम २४ घरे बांधण्यात येत आहेत.

ठळक मुद्देतब्बल १५ महिन्यांनी तिवरेवासियांच्या पुनर्वसनाला मुहूर्त११ कोटी रुपयांच्या निधीतून प्रथम २४ घरे

चिपळूण : तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेनंतर तब्बल १५ महिन्यांनी बाधितांच्या पुनर्वसन वसाहत कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुंबईतील सिध्दिविनायक ट्रस्टने मंजूर केलेल्या एकूण ११ कोटी रुपयांच्या निधीतून प्रथम २४ घरे बांधण्यात येत आहेत. यासाठी काढलेल्या घर बांधणीच्या दोन्ही निविदांची कामे राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांच्या कंपनीला मिळाली आहेत. सद्यस्थितीत अलोरे येथे बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली जागा साफसफाईला सुरुवात झाली आहे.गतवर्षी २ जुलैच्या रात्री तिवरे धरण फुटल्यानंतर उडालेल्या हाहाकारात अपरिमित आर्थिक व जीवितहानी झाली. तब्बल २२ जणांचे बळी गेले आणि ४५ कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी झाली. या कुटुंबियांना आर्थिक स्वरूपाची मदत झाली असून, काही महिन्यांपूर्वी येथील वाहून गेलेली जॅकवेल पुन्हा उभारून पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला आहे.त्यानंतर आता पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे. पुनर्वसन, रस्ते, पूल, साकवांसह धरण पुनर्बांधणी याची कार्यवाही सुरु केली आहे. यामध्ये मुख्यत: बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जात आहेत.प्रथमत: एक मॉडेल घर तयार करण्यात येणार आहे. तपासणीनंतर उर्वरित घरांच्या कामांना सुरुवात होणार आहे. अलोरे येथे कोयना प्रकल्पाची वसाहत पडून असल्याने तेथे १.६० हेक्टर जागेवर पुनर्वसन करण्यात येत आहे. पाणी, वीज, बाजारपेठ, शाळांसह सर्व सोयी सुविधांनी युक्त ही जागा महत्वाची आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे ३ कोटी ८० लाख रुपये खर्चाच्या २४ घरांसाठीच्या २ निविदा काढल्या होत्या. या दोन्ही निविदांची कामे राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली आहेत. तूर्तास २४ घरांचा प्रश्न सुटला आहे. एकूण ४० कुटुंबाचे पुनर्वसन होणार असल्याने व त्यातच काहीजणांना गावातच राहायचे असल्याने त्यांच्या जागेचा शोध सुरू आहे.

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण