शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

hanuman chalisa: रत्नागिरीत हनुमान चालिसा म्हणणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना रोखले, पाेलिसांनी काहींना घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 13:46 IST

कायदा व सुव्यवस्थेला बाधा पाेहाेचू नये यासाठी पाेलिसांनी हनुमान चालिसाचा हा कार्यक्रम राेखला.

रत्नागिरी : शहरातील मनसेच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरात हनुमान चालिसा म्हणण्याचा कार्यक्रम रत्नागिरी शहर पाेलिसांनी उधळून लावला. हनुमान चालिसा पठणासाठी जमलेल्या मनसेच्या ६ ते ७ कार्यकर्त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेऊन कार्यक्रमाला अटकाव केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भाेंगे ३ मे पर्यंत खाली उतरवण्याचे आवाहन केले आहे. हे भाेंगे खाली उतरवले नाही तर ३ तारखेपासून जिथे भाेंगे लागतील तिथे हनुमान चालिसा लावा असेही आदेश दिले. मात्र, ३ मे राेजी रमजान ईदमुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला हाेता. पण, आज, बुधवार ४ मेपासून सर्वत्र हनुमान चालिसा पठण आणि महाआरती कार्यक्रमाचे आयाेजन करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार ठिकठिकाणी या कार्यक्रमांचे आयाेजन केले जात आहे.रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस परिसरातील मनसे पदाधिकाऱ्याच्या घरात बुधवारी दुपारी १२ वाजता हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. याची माहिती रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकाचे पाेलीस निरीक्षक विनीत चाैधरी यांना मिळताच ते कर्मचाऱ्यांसह त्याठिकाणी दाखल झाले. या पदाधिकाऱ्याच्या घराच्या परिसरात मुस्लिम बांधवांचे वास्तव्य असून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पाेहाेचू नये यासाठी पाेलिसांनी हनुमान चालिसाचा हा कार्यक्रम राेखला.त्यानंतर पाेलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष रुपेश सावंत, अमाेल श्रीनाथ यांच्यासह ६ ते ७ जणांना घटनास्थळावरुन अटक करुन पाेलीस स्थानकात आणले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRaj Thackerayराज ठाकरे