शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आमदार राजन साळवी यांना मोठा दिलासा; पत्नी, मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर 

By मनोज मुळ्ये | Updated: February 13, 2024 13:56 IST

रत्नागिरी : बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल असलेल्या आमदार राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलाला उच्च न्यायालयाने अटकपूर्व ...

रत्नागिरी : बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल असलेल्या आमदार राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलाला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मंगळवारी उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.रायगड लाचलुचपत खात्याकडून आमदार राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत चौकशी करण्यात आली. त्यांच्यासह त्यांची पत्नी अनुजा, मुलगा शुभम, भाऊ दीपक, पुतण्याचीही चौकशी करण्यात आली. जवळपास सव्वा दीड वर्ष झालेल्या चौकशीदरम्यान, त्यांच्या घराची, सामानाची मोजदादही करण्यात आली. त्यानंतर १८ जानेवारी रोजी आमदार साळवी, पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून या तिघांवरही अटकेची टांगती तलवार होती.राजकारणात असल्यामुळे आपण अशा प्रसंगांना तोंड देण्यास समर्थ आहोत. मात्र आपली पत्नी आणि मुलगा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणे, ही बाब आपल्याला खूप लागली असल्याची प्रतिक्रिया आमदार साळवी यांनी दिली हाेती. त्यासाठी त्यांनी या दोघांच्या अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरू केले होते. या अर्जावरील सुनावणीनंतर सोमवारी (१२ फेब्रुवारी) उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी अनुजा आणि शुभम या दोघांच्याही अटकपूर्व जामीन अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. पत्नी आणि मुलाच्या अटकपूर्व जामीनामुळे आमदार साळवी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीHigh Courtउच्च न्यायालय