शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारने चिपळूणकरांच्या तोंडाला पाने पुसली, प्रसाद लाड यांचे टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 19:46 IST

ज्या-ज्या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे तिथे जनतेवर अन्यायच होत आहे, असा टोला आमदार प्रसाद लाड यांनी लगावला.

चिपळूण :  चिपळूणच्या पुरमुक्तीबाबत उपाययोजना राबविण्यात शासनाला रस नाही. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी केवळ १० कोटी रुपयांचे गाजर दाखवून चिपळूणकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महाविकास आघाडी सरकारने केवळ फसविण्याचा धंदाच सुरू ठेवला आहे. गाळाविषयी सरकार गंभीरतेने दखल घेत नाही. ज्या-ज्या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे तिथे जनतेवर अन्यायच होत आहे, असा टोला आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारला लगावला.चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ११ व्या दिवशी आमदार प्रसाद लाड यांनी भेट दिली. उपोषणाकर्त्यांचे म्हणणे एैकून घेतल्यानंतर यविरोधात आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कापसाळ विश्रामगृह येथे आमदार लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.लाड म्हणाले, वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्याची चिपळूणवासीयांची मागणी रास्त आहे. वाशिष्ठी नदीत ३ लाख ३० हजार घनमिटर गाळ काढण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी कागदोपत्री ७० हजार घनमिटर गाळ असल्याचे सांगतात. शासकीय विभागात एकमेकांच्यात ताळमेळ नाही. कोणाचा कोणाला पत्ता नाही. गाळ काढण्यासाठी ३०० कोटींची मागणी असताना केवळ १० कोटीचा निधी मंजूर होतो. ही लच्छनास्पद बाब आहे. जिथे जिथे शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे तिथे लोकांवर अन्याय होत आहे. येत्या ५ महिन्यात दोन्ही नद्यातील गाळ न काढल्यास पुन्हा चिपळूणात पुरपरिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात येतात, देवदर्शन घेतात. मात्र त्यांना उपोषणाचे काही देणे घेणे नाही. दोन दिवस जिल्ह्यात असतानाही त्यांनी चिपळूणकरांच्या उपोषणाला भेट देण्याचे टाळले आहे. खासदारांना तर गाळातलं काय कळतच नाही. उपोषणापर्यंत आमदार भास्कर जाधवांचे नेटवर्क पोहोचत नाही. यामुळेच चिपळूणकरांना न्याय मिळण्यासाठी अधिवेशनात भाजपच्या वतीने आवाज उठवून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू. चिपळूणकरांच्या आंदोलनात भाजपाने उडी घेतली आहे. आता चिपळूणकरांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प राहणार नाही, असे आश्वासन लाड यांनी दिले. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, तालुकाध्यक्ष विनोद बोभसकर, शहराध्यक्ष आशिष खातू, नगरेसवक विजय चितळे, माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे आदी उपस्थित होते.फडणवीस, दरेकर चिपळूणच्या आंदोलनात उतरतीलआमदार म्हणून नव्हे, तर कोकणचा सुपुत्र म्हणून आपण या आंदोलनाकडे पाहत आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही या आंदोलनाची दखल घेतली आहे. लवकरच ते या आंदोलनाला भेट देण्यासाठी येणार आहेत. तत्पूर्वी दोघेही येत्या हिवाळी अधिवेशनात चिपळूणच्या प्रश्नावरून सरकारला सळो की पळो करून सोडतील. त्याची प्रक्रिया त्यांनी सुरूही केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाPrasad Ladप्रसाद लाड