शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील मिरकरवाडातील गाळ उपसा सुरू, ड्रेझर, बार्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 12:55 IST

रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा मच्छीमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. या टप्प्याअंतर्गत प्रथम बंदरातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अत्याधुनिक फ्लोटिंग ड्रेझर तसेच बार्जही आणण्यात आली आहे.

ठळक मुद्देमिरकरवाडा मच्छीमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू दुसऱ्या टप्प्यासाठी ७२ कोटींच्या खर्चाला मंजुरीबंदरातील २ लाख ८१ हजार क्युबिक मीटर गाळाचा उपसा केला जाणार

रत्नागिरी ,दि. ११ : शहरातील मिरकरवाडा मच्छीमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. या टप्प्याअंतर्गत प्रथम बंदरातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अत्याधुनिक फ्लोटिंग ड्रेझर तसेच बार्जही आणण्यात आली आहे. बंदराच्या दुसऱ्या टप्प्यातील या कामासाठी ७१ कोटी ८० लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे.जिल्ह्यातील मिरकरवाडा हे सर्वात मोठे मच्छीमारी बंदर आहे. राज्यात व केंद्रात कॉँग्रेस व घटक पक्षांचे सरकार असताना तत्कालिन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी खास दुसऱ्या टप्प्यातील कामांना व निधीलाही मंजुरी दिली होती. मात्र, गेल्या तीन वर्षात हे काम रेंगाळलेले होते. आता या कामाला गती मिळाली असून, दुसऱ्या टप्प्यातील गाळ उपसा करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. बंदरातील २ लाख ८१ हजार क्युबिक मीटर गाळाचा उपसा केला जाणार आहे.दुसऱ्या टप्प्यातील बंदराजवळील समुद्रात ६७५ मीटर लांबीच्या ब्रेकवॉटर वॉलला मंजुरी देण्यात आली होती. त्यातील ५२५ मीटर वॉलचे काम पूर्ण झाले आहे. या बंदरात ज्या चॅनेलने मच्छीमारी नौका ये-जा करतात, त्या चॅनेलमधील गाळ काढण्याचे काम दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.

६०० क्युबिक मीटर गाळ उपसा क्षमता असलेली बार्ज आणि फ्लोटिंग ड्रेझरही यासाठी बंदरात कार्यरत झाला आहे. त्यामुळे आता जलदगतीने गाळ उपसा होईल, असा विश्वास मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGovernmentसरकार