शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

मंडणगडवर लाखो रूपयांची खैरात

By admin | Updated: September 26, 2015 00:21 IST

चाहुल निवडणुकीची : श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले

मंडणगड : तालुक्याची ग्रामपंचायत कुठल्याही निकषात बसत नसतानाही केवळ शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे नगरपंचायत होत आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहराच्या विकासासाठी निधीची खैरात केली जात आहे. सत्तेसाठी निधीची खैरात वाटणाऱ्या राजकीय पक्षांकडून शहराव्यतिरिक्त तालुका मात्र उपेक्षित राहिला आहे.मंडणगड तालुका विकासकामांसाठी अनुकूल होता, असे असले तरी नगरपंचायत अस्तित्त्वात येईपर्यंत याकडे कोणत्याही राजकीय पक्षांचे लक्ष नव्हते. शहरातील स्वच्छता, नालेसफाई, पाखाड्या, अनधिकृत खोके, पाणी प्रश्न यांसारखे अनेक विषय न सुटणारे कोडे बनले होते़ मात्र, नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होताच शहरातील विकासकामांसाठी विविध पक्ष सत्तर लाखाहूनही अधिक निधी देण्यास तयार झाले आहेत़ आमदार संजय कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शहरात नुकतेच चाळीस लाखांच्या विकासकामाचे नारळ फोडले आहेत. भारतीय जनता पार्टीनेही शहरासाठी पंचवीस लाखांची विकासकामे देण्याचे जाहीर करुन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला आहे.शहर बसस्थानक आवारातील प्रसाधनगृहाचे उद्घाटन याचवेळी झाले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांपूर्वीच विकासकामे होत आहेत़ दुसरीकडे मंडणगड पाटपन्हळे रस्ता, मंडणगड स्टॅण्ड परिसरातील प्रसाधनगृह अशा अनेक विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्नही विविध राजकीय पक्षांकडून होत असल्याचे दिसत आहे़ आजवर शहरातील ग्रामपंचायतीत येथील नागरिकांनी विविध पक्षांना संधी दिली होती. मात्र, येथील समस्या दिसूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व आता त्यासाठी लाखो रुपयांच्या निधीची खैरात ओतून सत्तेत येण्याची स्वप्न पाहात आहेत़ दुसरीकडे पंचायत समिती ते खासदारकीपर्यंतची सत्तेतील सर्व पायऱ्या सोबत असून, केवळ नाकर्तेपणामुळे शहराला विकासापासून दूर ठेवू पाहणाऱ्यांना तसेच आजवर आमच्या हातात काही नाही, असे म्हणवणाऱ्यांना अचानक शहर विकासाचा कसा पुळका आला आणि निधी कसा उभा केला? आजवर शहरातील या समस्या दिसत नव्हत्या का? असा सवाल केला जात आहे. (प्रतिनिधी)नजीकच्या काही महिन्यातच नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारा हक्काचा निधी नगरपंचायतीला मिळणार आहे़ त्यावेळी नगरपंचायत स्वत:चा विकास स्वत: करू शकणार आहे़, असे असताना केवळ नगरपंचायतीत आपले राजकीय अस्तित्व राखण्यासाठी विविध पक्ष सरसावले आहेत.